वरणगाव – छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती सोमवारी 21 मार्च रोजी मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. सायंकाळी निघालेल्या घोडा बग्गीसह मोटर सायकल रॅलीने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले.

सायंकाळी पाच वाजता सिद्धेश्वर नगर येथील छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी पुष्पहार अर्पण करून शासकीय विश्रामगृह येथून मोटार सायकल रॅलीला भगवा ध्वज दाखवून शुभारंभ करण्यात आला.
मोटर सायकल रॅली मध्ये सहभागी झालेल्या मावळ्यांनी भगवे फेटे बांधून गाडयांना भगवे ध्वज लावून संपूर्ण वातावरण भगवेमय झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा विद्युत रोषणाईने सजवलेल्या घोडा बग्गीत विराजमान करण्यात आला होता. सजवलेल्या घोडा गाडी आणि मोटर सायकल रॅलीने संपूर्ण वरणगाव वासियांचे लक्ष वेधून घेतले होते.
शिवसैनिक स्व. अबरार खान यांचे मागील काही दिवसापूर्वी निधन झाल्याने त्यांच्या घराजवडून मोटार सायकल रॅली थोडावेळ थांबून स्व. अबरार खान यांना श्रद्धांजली अर्पण करून अबरार खान कायम स्मरणात राहील अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
यावेळी जिल्हाप्रमुख समाधान महाजन, जिल्हा संघटक विलास मुळे, उपतालुकाप्रमुख सुभाष चौधरी, पं. स. सदस्य विजय सुरवाडे, अल्पसंख्यांक समाजाचे नेते हिप्पी शेठ, शहरप्रमुख संतोष माळी, निलेश ठाकूर, अल्पसंख्यांक संघटक सईद मुल्लाजी, तालुका संघटक मोहसीन खान, उपशहर प्रमुख सुखदेव धनगर, अशोक शर्मा, बाळू माळी, राजु माळी, निलेश काळे, उमाकांत झांबरे, यशवंत बढे, दिनेश माळी, प्रकाश कोळी, वैभव लोखंडे, शेख अझहर, शहर संघटक पंकज चौधरी, शहर समन्वयक अमर सोनार, आबा सोनार, किरण माळी, नितीन पाटील, गोविंदा चौधरी, दिपक शेडके, रुपेश ठाकूर, वसीम शहा, राहुल वंजारी, दीपक बढे, मनोज देवगिरीकर, आरिफ मन्यार, अतुल माळी, सागर माळी, पवन चौधरी, अजय सोनार, दिपक शेळके, सागर वंजारी यांच्यासह शिवसैनिकासह शहरासह परिसरातील विविध भागातील तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अशी निघाली मोटारसायकल रॅली-
सायंकाळी 5 वाजता सिद्धेश्वरनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शासकीय विश्राम गृह येथून मोटार सायकल रॅलीचा प्रारंभ होऊन स्टॅन्ड रोड, भाजी मार्केट, मोठी होळी, चौधरी वाडा, बढे वाडा, मोठा माळी वाडा, गांधी चौक, न.पा.मार्गे नदी पात्रात रॅलीचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जोरदार घोषणाबाजी करून समारोप रेलीचा समारोप करण्यात आला.
वरणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिषकुमार अडसूळ, प्रशांत दळवी, होमगार्डचे संजय चौधरी यांच्यासह पोलीस कर्मचारी होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त ठेवून शांततेत जयंती साजरी झाली.


