भुसावळ : शहरातील प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात मंगळवार 22 रोजी ‘रीसेंड ट्रेण्डस इन इनवायरमेंट अॅण्ड बायोलॉजीकल सायन्स 2022’ या विषयावर राष्ट्रीय परीषदेचे ऑनलाईन पध्दतीने आयेाजन करण्यात आले आहे. उद्घाटन उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलसचिव किशोर पवार यांच्या हस्ते होईल.
बिकारनेरच्या शासकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मीरा श्रीवास्तव, प्रा.शीतल भासीन (बायोसायन्स विभाग, महाराजा रणजितसिंह महाविद्यालय, इंदोर) व प्रा.गीता पडाते (प्राणीशास्त्र विभाग, महाराजा सयाजीराव विद्यापीठ, बडोदरा) यांचे व्याख्यान होणार आहे. संस्थाध्यक्ष पद्मा कोटेचा, प्राचार्य डॉ.मंगला साबद्रा, उपप्राचार्य डॉ.जे.व्ही.धनवीज व वाय.डी.देसले यांच्या मार्गदर्शनाखाली परीषद होत आहे. या परीषदेत विद्यापीठ क्षेत्रातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक डॉ.जीवन धांडे, डॉ.मीना चौधरी व सुनील वंजारी यांनी केले आहे.



