फैजपूर शहरातुन १८ वर्षीय तरूण बेपत्ता :

फैजपूर : येथील कासार गल्लीतिल रहिवासी तरूण मोबाईल ठेवून
आणि चिठ्ठी लिहून घरातून निघून गेला आहे . नातेवाईकांकडून त्याचा शोधाशोध सुरू आहे ,

. आदित्य तुळशीराम काठोके ( वय -१८ ) हा तरूण फैजपूर शहरातील कासार गल्लीत राहतो त्याचे कुटुंबात आई , वडील आणि बाहिणी असा परिवार आहे . आदित्य सध्या जळगाव येथील शासकीय औद्यागिक प्रशिक्षण केंद्रात शिक्षण घेत आहे तर वडील तुळशीराम काठोके हे प्लॉट खरेदी व विक्री करण्याचे काम करतात .
दरम्यान , सोमवारी २१ मार्च रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास अदित्य काठोके हा घरात कुणाला काहीही न सांगता त्याचा मोबाईल आणि चिठ्ठी लिहून घरातून कपड्यांची बॅग घेवून बेपत्ता झाला आहे . चिठ्ठीत त्याने लिहून ठेवले की , मला घरात सन्मान मिळत नाही , म्हणून मी घर सोडून जात आहे , मला कुणी विचारत नाही . असा मजकूर लिहिलेला आढळला . आईवडील व बहिण यांनी आदित्य याचा शोध केला आहे अद्याप फैजपूर पोलीसात कुठलीही नोंद अथवा तक्रार करण्यात आलेली नाही . कुणाला सदरील तरूण आढळून आल्यास 9423914789 , 9595766378 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे .या बाबतची पोस्ट सोशल मीडिया ला पण त्यांच्या कुटुंब व मित्र मंडळी कडून व्हायरल केली जात आहे.अद्याप याबाबत फैजपूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आलेली नााही .