भुसावळ : शहरातील जामनेर रोडवरील पांडुरंग टॉकीजमधील आनंद लॉजमध्ये पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या विशेष पथकाने सोमवार, 21 रोजी दुपारी अचानक छापा टाकला या धाड़ीत पाच वेश्यांसह जिल्ह्यातील पाच आंबटशौकीन ग्राहकांना ताब्यात घेतल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांना हॉटेलमध्ये अवैधरीत्या वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलिस पथकाने छापा टाकल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलिसांच्या पथकाने लॉजमधून पाच वेश्यांसह पाच आंबटशौकीन ग्राहकांना ताब्यात घेतले आहे शिवाय अनैतिक व्यवसाय सुरू ठेवल्याप्रकरणी हॉटेल मॅनेजरसह मालकाला ताब्यात घेतल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली
अनैतिक प्रकारांना शहरात पूर्णपणे पायबंद घालण्यासाठी पोलिस प्रशासनाने भुसावळ शहरातील सर्वच हॉटेलसह लॉजेसची कसून तपासणी करावी, अशी मागणी शहरातील सुज्ञ नागरीकांकडून केली जात आहे. हॉटेल/लॉजच्या नावाखाली सुरू असलेल्या अनैतिक प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली आहे.



