फैजपूर- यावल तालुक्यातील राहणाऱ्या मुलीला भावाला धक्का देत दोन जणांनी दुचाकीवरून पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे . याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

याबाबत माहिती अशी की , यावल तालुक्यातील एका गावात राहणारी मुलगी ही कुटुंबियांसह वास्तव्याला आहे . यावल तालुक्यातील फैजपूर येथे खंडोबा यात्रेच्या निमित्ताने मुलगी , तिचा भाऊ आणि नातेवाईक असे तिघे जण रविवार २० मार्च रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास आले होते . दरम्यान अडीच वाजेच्या सुमारास पिडीत मुलीसह तथाभाऊ आणि नातेवाईक असे तीघे घरी जात होते . त्याचवेळी जीवन अशोक भालेराव रा . भालोद ता .यावल आणि आकाश संजय भागेश्वर रा .सावदा ता . रावेर हे दुचाकीवर आले . दोघांनी पीडीत मुलीच्या भावाला व नातेवाईकाला धक्का दिला व “ मुलीला सोडले नाही तर मी तुला जिवंत सोडणार नाही ” अशी धमकी देवून पिडीत मुलीला दुचाकीवर बसवून पसार झाले. याबाबत दोघांनी लागलीच फैजपूर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली .त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी जीवन अशोक भालेराव रा . भालोद ता .यावल आणि आकाश संजय भागेश्वर रा .सावदा ता . रावेर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोहन लोखंडे करीत आहे .


