जिल्हा कॉग्रेस कमेटीतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन :


भुसावळ – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीथीनुसार असलेल्या जयंती निमित्त २१ मार्च सोमवार रोजी जळगाव जिल्हा कॉग्रेस कमेटी अल्पसंख्याक विभाग व भुसावळ शहर सेवादल, तर्फे जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचे अश्वारूढ पूर्णाकृती पुतळ्यास माल्यार्पन करून अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी जिल्हा अल्पसंख्यांक विभाग मो.मुनव्वर खान , जिल्हा उपाध्यक्ष जे बी कोटेचा , शहर अध्यक्ष सेवादल संजय खडसे, डॉ नईम मझहर दाऊदी, भुसावळ अल्पसंख्यांक शहर अध्यक्ष सलीम गवली जिला उपाध्यक्ष मेहबूब खान,असगर भाई ,हमीद शेख सर व अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .