भुसावळात श्रीछत्रपती शिवाजी महाराज जयंती जल्लोषात व उत्साहात साजरी :


भुसावळ – हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथी नुसार ३९२ वी जयंती शिवसैनिक यांचेसह शिवप्रेमी नागरिकांनी मोठ्या उत्साहात व आनंदाने साजरी केली . यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय , हर हर महादेव , जय शिवाजी जय भवानी च्या गगनभेदी घोषणा व शिवरायांचा जयजयकार करण्यात आला .
कोरोनामुळे मागील दोन वर्षात शिवजयंती साजरी करु शकलो नाही यंदा मात्र कोरोना नियंत्रणात असल्याने नियम शिथिल झाल्याने नागरिकांनी जल्लोष साजरा केला .
भुसावळात शिवप्रेमी जनतेसह शिवबांच्या मावळ्यांनी जयंतीच्या पूर्वसध्येला रात्री १२ वाजता भुुुसावळ रेल्वे स्थानकानजिक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्णाकृती अश्वारूढ पुतळ्यास माल्यार्पण करुन मानवंदना देवून अभिवादन करण्यात आले . यावेळी सामूहिकरित्या शिववंदना म्हणून राजें छत्रपती शिवाजी महाराजांचे जयघोष करुन मानवंदना वाहिली .
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज उत्सव समिती अध्यक्ष किरण मिस्त्री , राजेन्द्र वानखेडे माजी नगराध्यक्ष सावदा ,
उत्सव समिती सदस्य नगरसेवक भुसावळ मुकेश गुंजाळ,नमा शर्मा, नगरसेवक किरण कोलते,योगेश बागुल,कृष्णा शिंदे, मिलींद कापडे, पंकज हिंगणे, निलेश हिंगणे ,अॅड. कैलाश लोखंडे, उमेश पाटील,जीतू खुपसे, भुषण महाजन हे उपस्थित होते.
पोलिसांनी चोख बंदोबस्त राखला