भुसावळ – खान्देश अंधकल्याण सोसायटी अंजाळे येथील अंध महिलाश्रम येथे अपंग सहाय्य दिना निमित्ताने
श्री.व सौ. गव्हाळे व रेखा तळेले यांचेतर्फे दिव्यचक्षू लोकांसाठी अन्नदानाचा कार्यक्रम घेऊन अपंग सहाय्यता दिवस साजरा करण्यात आला .
प्रारंभी सक्षम कौन्सिलींगच्या आरती चौधरी यांच्या हस्ते आयोजित कार्यक्रमांचे दीप्रज्वलन करून सुरुवात झाली . यावेळी अध्यक्षस्थानी सक्षम कौन्सिलींगच्या आरती चौधरी होत्या. तर पाहुणे म्हणून लोहमार्ग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विजय घरडे रोटरीचे अध्यक्ष राजेंद्र फेगडे , सौ अर्चना फेगडे, सौ. प्राची राणे, डॉ. बाळू पाटील हजर होते.
यावेळी दिव्य चक्षु प्रभाकर सुरळकर यांनी सुंदर आवाजात स्वागतगीत सादर केले .
खान्देश अंधकल्याण सोसायटी अध्यक्ष संजय पाटील यांनी प्रास्ताविक केले. सुत्रसंचलन गव्हाळे यांनी केले.
प्रमुख पाहुणे पोलिस निरीक्षक घरडे यांनी भाषणात सांगितले की रेल्वेच्या अंतर्गत कोणी दिव्यांग आले तर आम्ही सदैव मदतीला तत्पर असतो .
सौ. आरती चौधरी यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की देव जेव्हा माणसाला एखादी बाब कमी देतो त्याबदल्यात दोन अधिक चांगल्या गोष्टीही देत असतो. बदलत्या काळानुसार शासनाने दिव्यांग बांधवाक़रीता विविध योजना सुरु केल्या आहेत या अंतर्गत रेल्वे प्रशासनाने देखील (रेल्वे डब्यांवर, बर्थवर ब्रेल लिपीत सुचना लिहिल्या आहेत) , खाजगी संस्था दिव्य चक्षु लोकांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी काम करीत असून विविध योजना राबवित आहे.
रो. अध्यक्ष राजेंद्र फेगडे यांनी रेल्वेत खाद्य पदार्थ विक्री करणाऱ्या अंधबांधवांना सबंधित अधिकारी व अन्य बांधवानी मदत वा सहकार्य करण्याचे आवाहन केले.
यशवंत गव्हाळे. सौ. प्रमीला गव्हाळे , शिरीष गव्हाळे , सौ. वैशाली गव्हाळे , सुनीलकुमार तिवारी, सौ.मंदाकिनी तिवारी, नारायण विसपुते, सौ. सुनंदा विसपुते यांनी जेवणाचे डबे वाटप करन्यास सहकार्य केले .



