भुसावळ स्पोर्ट्स अँड”भुसावळ स्पोर्ट्स अँड””लेडीज रनच्या स्पर्धकांसाठी विशेष झुम्बा सेशनचे आयोजन: पारुल वर्मा यांचे मार्गदर्शन”
भुसावळ – भुसावळ स्पोर्ट्स अँड”लेडीज रनच्या स्पर्धकांसाठी विशेष झुम्बा सेशनचे आयोजन: पारुल वर्मा यांचे मार्गदर्शन”
भुसावळ – अँड रनर असोसिएशन आयोजित लेडीज इक्वलिटी रन 27 मार्च रोजी रेल्वे क्रीडांगणावर संपन्न होणार आहे.या स्पर्धेच्या स्पर्धकांसाठी रविवार रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणावर विशेष झुंबा सेशनचे आयोजन करण्यात आले. यावेळी एपीएस फिटनेसच्या संचालिका व झुंबा ट्रेनर पारुल वर्मा यांनी उपस्थित महिलांना झुम्बाच्या विविध पैलूबद्दल मार्गदर्शन केले.
साधारणतः प्रत्येक मॅराथॉन मध्ये झुंबा आयोजित केला जातो. त्यामुळे स्पर्धकांना या व्यायाम प्रकाराची सवय व आवड निर्माण व्हावी म्हणून या सेशनचे आयोजन केल्याचे लेडीज रनच्या संयोजिका डॉ. नीलिमा नेहते व डॉ. चारुलता पाटील यांनी सांगितले.यावेळी 150 हून अधिक महिलांनी सहभाग नोंदविला.
सुरुवातीला वॉर्मअप, त्यानंतर चार किमी रनिंगचा सराव व त्यानंतर झुंबा सेशन घेण्यात आले. झुम्बा डान्स केल्यामुळे रनिंग सोबतचा आनंद द्विगुणित झाल्याचे यावेळी पूजा बलके, सोनाली वारके, संजीवनी लाहोटी, सोनाली पाटील, कृपा मूलचंदानी, प्रिया पाटील, शितल चोरडिया, मीना नेरकर, सरोज शुक्ला या मैत्रिणींच्या चमूने सांगितले.
भुसावळ रनरतर्फे यानंतर देखील सातत्याने शहरातील नागरिकांसाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन विनामुल्य करण्यात येईल अशी माहिती यावेळी प्रवीण पाटील, ब्रिजेश लाहोटी ,गणसिंग पाटील, प्रविण वारके व रणजित खरारे यांनी दिली.
यावेळी एपीएस फिटनेसच्या निलांबरी शिंदे, पूनम सुरवाडे, किर्ती चौरसिया, रूपाली पाटील, सविता मगरे, माया पवार, लवली पवार, अंजुं गवळी, उज्वला भावे, सविता घाटे, छाया चौधरी, काजल महाजन या सदस्यांनी महिला धावपटूसोबत झुम्बा डान्स करून त्यांचा उत्साह वाढविला.
याप्रसंगी रूपाली चव्हाण, सरला पाटील, चित्रा करकरे, कीर्ती मोटरकर, सोनम जमनानी आदी स्पर्धकांची विशेष उपस्थिती होती.



