भुसावळ शहरात महाराष्ट्र भूषण डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त स्वच्छता अभियान :

भुसावळ – येथील शासकीय कार्यालये व शहरातील प्रमुख रस्ते यांची स्वच्छता दूत आदरणीय तीर्थरूप पदमश्री डॉ. श्रीआप्पासाहेब धर्माधिकारी व आदरणीय तीर्थरूप डॉ.श्री सचिन दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शना मध्ये महाराष्ट्र भूषण आदरणीय तीर्थरूप डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भुसावळ विभागामध्ये स्वच्छता अभियान संपन्न झाले.

सविस्तर वृत्त असे की,आज दिनांक २० मार्च २०२२ वार रविवार रोजी भुसावळ विभागातील भुसावळ, यावल व चोपडा य तालुक्यांमध्ये शासकीय कार्यालये व शहरातील प्रमुख रस्ते यांची स्वच्छता डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष स्वच्छता दूत आदरणीय तीर्थरूप पद्मश्री डॉ.श्री आप्पासाहेब धर्माधिकारी व आदरणीय तीर्थरूप डॉ.श्री सचिन दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शना मध्ये संपन्न झाले. सदर अभियानामध्ये भुसावळातील २९७ यावलयेथील १२६ चोपडा येथील ९९अशा एकूण ५२६ श्री सदस्यांनी सहभाग घेतला. या उपक्रमात भुसावळातील १३यावल मधील चोपड़ा येथील ६ असे एकूण ३० सरकारी कार्यालय व २१ किलोमीटर लांबीचे रस्ते यांची स्वच्छता करण्यात आली.

या उपक्रमातून भुसावळ येथील १२.५५ यावल येथील ४५.८६० व चोपडा येथील ३.९ टन असे एकूण ६२.३९ टन कचरा संकलित करून शहरातील डम्पिंग ग्राउंड वर त्याची विल्हेवाट करण्यात आली साठी 18 ट्रॅक्टरचा वापर नियोजनबद्ध व शांततापूर्वक करण्यात आला.डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत रक्तदान शिबिर, वृक्ष लागवड व संवर्धन पाणपोई,जलपुनर्भरण,आरोग्य तपासणी शिबिर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर जलाशयांमध्ये काढणे बस थांबे निर्मिती,ज्येष्ठ नागरिक दाखला वाटप यासारख्या विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असतात.