नाशिक- भुसावळ नगर परिषदेचे भाजपा नगरसेवक व जळगाव रिपाई (आठवले गट)जिल्हाध्यक्ष स्व रविंद्र बाबुराव खरात उर्फ हंप्या व त्याच्या घरातील एकूण चार जणांचा रिवॉल्वरने फायर करून जीवे ठार मारले होते याघटनेत एकूण पाच जणांचा खून करून व इतर तीन जणांना जबर जखमी करून फरार असलेल्या गुन्ह्यातील प्रमुख संशयितास नाशिकरोड पोलिसांनी मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.
याबाबत अधिक माहिती अशी की,तीन वर्षांपूर्वी भुसावळ नगर परिषदचे भाजपा नगरसेवक व रिपाई (आठवले गट) जिल्हाध्यक्ष रविंद्र बाबुराव खरात उर्फ हंप्या राहणार, भुसावळ जिल्हा जळगांव यांच्या घरात घुसून त्याना व त्याच्या परिवारावर रिव्हलवर मधून बेशुट गोळीबार केला, त्यात नगरसेवक रविंद्र बाबुराव खरात व त्यांच्या घरातील चार असे एकूण पाच जणांना ठार केले होते. हल्ला करून संशयित पळून जात असताना मोठा गदारोळ झाल्याने संशयितांना पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी नागरिकांवर त्यांनी हल्ला चढवल्याने त्यात जवळपास तीन जण गंभीर जखमी झाले होते. हे हत्याकांड संपूर्ण राज्यभरात मोठ्या प्रमाणात गाजला होता. विधानसभेतही त्याचे पडसात उमटले होते. त्यामुळे या गुन्ह्याचा तपास मुंबई येथील सीआयडी विभागाकडे वर्ग करण्यात आला होता. तेव्हापासून यातील प्रमुख अरबाज अजगर खान ऊर्फ गोलू खान हा फरार होता. त्यामुळे पोलिसांपुढे या संशयित गुन्हेगारास पकडण्याचे मोठे आव्हान उभे राहिले होते.

शुक्रवारी नाशिकरोड पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी पोलीस हवालदार अनिल शिंदे,विशाल पाटील,विष्णू गोसावी,मनोहर शिंदे, राकेश बोडके,सोमनाथ जाधव, कुंदन राठोड, केतन कोकाटे, सागर आडणे हे जेलरोड पाण्याची टाकी परिसरात गस्त घालीत असतांना कर्मचारी मनोहर शिंदे यांना गुप्त बतमीदारकडून माहिती मिळाली की,भुसावळ पोलिसां कडील गुन्हा रजि.२२२/२०१९ मधील प्रमुख संशयित अरबाज अजगर खान ऊर्फ गोलू खान हा संशयित जेलरोड परिसरात फिरत असल्याची माहिती समजली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांना माहिती दिली. वरिष्ठच्या मार्गदर्शनाखाली सेंट्रल जेल परिसरात सापळा लावण्यात आला. तेव्हा गोलू खान पळून जात असतांना पोलिसांनी त्यास मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. नाशिकरोड पोलिसांनी कायदेशीर सोपस्कार उरकून त्यास पुढील चौकशीकामी सीआयडीच्या ताब्यात दिले.
दरम्यान सदरची कामगिरी पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय, पोलीस उपायुक्त विजय खरात, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, पोलीस निरीक्षक गणेश न्याहदे, पोलीस निरीक्षक राजू पाचोरकर,सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे व गुन्हे शोध पथकातील पोलीस कर्मचारी यांनी पार पाडली.


