भुसावळातील रेकॉड वरील दोघे हद्दपार :


भुसावळ – आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठि पोलिस
बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीत रेकॉड वरील दोन गुन्हेगारां विरुद्ध भुसावळ शहर पोलीस स्टेशन यांच्याकडून मार्च 2021 मध्ये त्यांचे विरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 56(1)(अ)(ब) प्रमाणे प्रस्ताव सादर करण्यात आला होता.त्यातील रेकॉड वरील दोन इसम हद्दपार करण्यात आले आहे.

सदर हद्दपार इसमाविरुद्ध विविध गुन्हे दाखल असून त्यांचे विरुद्ध उपविभागीय दंडाधिकारी भुसावळ भाग यांनी सादर केलेल्या चौकशी अहवालाच्या आधारावर संशयीत आरोपी गणेश रमेश कवडे राहणार घमाडीया प्रेस जुनी जीन भुसावळ तसेच राहुल नामदेव कोळी राहणार जुना सातारा मरीमाता मंदिरा जवळ भुसावळ येथील दोघांना दिनांक 3 मार्चय 2022 रोजी हद्दपार करण्यात आले आहे. सदर इसमास हद्दपार करणेकामी शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक बी.बी.ठोंबे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि विनोद कुमार गोसावी,स.फौज.अनिल चौधरी, पोकॉ पराग सोनवणे यांनी कारवाई केली आहे. सदर हद्दपार आदेशाची बजावणी प्रक्रिया पोलीस निरीक्षक6Y भुसावळ शहर पोलीस स्टेशनचे यांच्याकडून सुरू आहे