साकळी ता.यावल- अलीकडच्या काळात हवामानात मोठे बदल झाल्यामुळे शेती व्यवसाय पूर्णपणे संकटात आलेला आहे.तथापि शेती व्यवसाय उज्ज्वल करण्यासाठी शेती पूरक व्यवसाय केल्याशिवाय पर्याय नाही.शेतीच्या शाश्वत प्रगतीसाठी पोखराच्या अनुषंगाने काम करा.पारंपारिक शेती निश्चित करा पण कमी खर्चात शेतीत वेगळे प्रयोग कराल तेव्हाच शेती फायदेशीर राहील.असे प्रतिपादन कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांनी नेवे फार्मर प्रोड्यूसर कंपनी तर्फे आयोजित शेतकरी प्रशिक्षण व मार्गदर्शन कार्यशाळेत केले.त्यांनी शेतकर्यांना अतिशय मार्मिकपणे मार्गदर्शन केले. साकळी ता.यावल येथे दि.३ रोजी पीक संरक्षण सोसायटीच्या सभागृहात सदर कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली होती. या कार्यशाळेला महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचे उपसंचालक अनिल भोकरे हे अध्यक्षस्थानी होते तसेच मार्गदर्शक म्हणून तंत्र सहाय्यक संजय पवार (जळगाव),यावल तालुका कृषी अधिकारी सागर सिनारे आदी मान्यवर अधिकारी उपस्थित होते .
यावेळी व्यासपीठावर जेडीसीसी बँकेचे संचालक विनोद पाटील, मंडळ अधिकारी अजय खैरनार (यावल, साकळी आयडीबीआय बँकेचे व्यवस्थापक विवेक यावले,जितेंद्र नेवे (छोटूबाबा),सय्यद अहमद सय्यद मीरा,मोहसिनखान हाजी असिफखान, रविंद्रसिंग यादव, हितेंद्र चौधरी, प्रमोद सोळंके, किरण महाजन,श्याम महाजन दीपक महाजन,सेवानिवृत्त कृषी सहाय्यक एम.एन.खंबायत यांचेसह प्रमुख अतिथी उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रसंगी नेवे फार्मर प्रोड्यूसर कंपनीचे सीईओ विलास नेवे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमात मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तसेच शेती पूरक व्यवसायात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे साकळीतील युवा शेतकरी तथा रेशीम उद्योजक दीपक महाजन व जगदीश पाटील तसेच कुक्कुटपालक व पशुखाद्य निर्मितीचे उद्योजक गणेश माळी यांचा विशेष गौरव करण्यात आला.
नेवे फार्मर कंपनीने शेती पूरक व्यवसायात वेगवेगळ्या माध्यमातून प्रगती साधावी तसेच शेतकऱ्यांना आधुनिक शेती व्यवसाया करिता प्रशिक्षित केले पाहिजे. तेव्हाच नेवे फार्मर कंपनी बलशाली होईल.कृषी यंत्रणेमार्फत विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन कंपनीने घेतले पाहिजे व शेतकऱ्यांना समृद्ध बनविले पाहिजे. असेही यावेळी श्री भोकरे यांनी मनोगतात सांगितले.
शेती संबंधी विविध योजना बाबत तंत्र अधिकारी संजय पवार यांनी सखोल मार्गदर्शन केले यात पोखरा योजना वैयक्तिक व सामूहिक अशा दोन प्रकारात शेतकऱ्यांच्या लाभाची आहे. विविध अशा शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी तसेच शेतीसाठी लागणारी साधन सामुग्री घेण्यासाठी शेतकर्यांना शासनाकडून विविध योजनांच्या माध्यमातून अनुदान दिले जाते या योजनेच्या माध्यमातून शेतकरी समृद्ध होऊ शकतो.असा आशावाद पवार यांनी व्यक्त केला. यानंतर तालुका कृषी अधिकारी सागर सिनारे यांनीसुद्धा महाडीबीटी विषयी मार्गदर्शन केले.या कार्यशाळेस गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन स्वयंदीप प्रतिष्ठानचे संचालक संदीप पाटील (डांभुर्णी) यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी नेवे फार्मर प्रोड्यूसर कंपनीचे सीईओ विलास नेवे यांचेसह श्रीधर चौधरी,जगन्नाथ नेवे, पल्लवी पाटील, अनिता वाणी,सविता तायडे, दीपक महाजन,मयूर नेवे,सुनीता दलाल,अश्विनी पाटील, दिव्या पवार,गणेश पाटील या कंपनीच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.



