भुसावळ:- शहराजवळील महामार्गालगत असलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर स्मार्ट व्हिलेज साकेगाव, जळगाव जिल्हा टेनिस बाँल क्रिकेट संघटना व माँनीग सी. सी आयोजित सरपंच चषक सीजन -७ स्पर्धेत सर्व सामने अटीतटीच्या होत असून ओमसाई ग्रुप, रामराज्य, ऐम्पार मल्हार, जय भवानी, योद्धा संघाने सामने जिंकले. शिवरात्रीच्या दिवशी प्रेक्षकांनी सामने पाहण्यासाठी तोबा गर्दी केली होती.

फ्रीडम फायटर ओम साई ग्रुप या सामन्यातून साई ग्रुप मे आठ गडी राखून विजय मिळवला यात डॉक्टर प्रवीण भोई यांनी नॉट आउट ५१ धावा काढल्या तर दुसरा सामना मध्ये भवानी टायगरला राम राज्य संघाने ११ धावांनी नमविले.
एम्पायर मल्हार संघाने दंगल संघावर ४५ धावांनी विजय मिळविला या सामन्यात देवाने ३८ धावा काढल्या यात तब्बल सहा षटकारांचा समावेश होतो.
जय भवानी विरुद्ध आँल स्टार या सामन्यात जयभवानी संघाने ३४ धावांनी आँलस्टार पर विजय मिळविला. योद्धा विरुद्ध वीर भगतसिंग या सामन्यात मध्ये योद्धा संघाने ५३ धावांनी विजय मिळवला यात गौरव पाटीलने नॉट आउट ४१ धावा केल्या यात सहा षटकार समावेश होता.
स्पर्धेतील मॅन ऑफ द मॅच ला नाना सोनवणे यांच्यातर्फे लोवर पँन्ट तर निर्मल कोठारी यांच्यातर्फे बँट देण्यात येणार आहे.
तर आयोजन कमिटी सदस्य अजय चौधरी यांच्या तर्फे टी-शर्ट देण्यात येणार आहे
हायकोर्टाचे रिटायर्ड स्टेनो स्पर्धेचे विशेष आकर्षण
खेळाला वय मर्यादा नसते याचा प्रत्यय साकेगाव येथे सुरू असलेल्या स्पर्धेदरम्यान दिसून येत आहे मुंबई येथील हायकोर्टात स्टेनो असलेले ६२ वर्षीय रिटायर्ड सुनील सूर्यवंशी यांनी स्पार्टन संघाकडून खेळताना उत्कृष्ट गोलंदाजी केली तरुणांना लाजवेल अशा पद्धतीने खेळ दाखवला.
गावाचा उत्सव शिगेला
ग्रा. प. जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट संघटना, मॉर्निंग सी. सी. आयोजित सरपंच चषक स्पर्धेला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले असून, सामने पाहण्यासाठी गावातील देशभरात विविध राज्य व शहरात गेलेले खेळाडू ,चाहते हे गावात दाखल झाले असून स्थानिक कर्मचाऱ्यांनीही स्पर्धेसाठी सुट्ट्या टाकले असून सकाळ पासून क्रीडाप्रेमी मैदानावर सामन्यांचे मनसोक्त आनंद घेताना दिसून येत आहे.


