वरणगाव – अभ्यास लक्षात ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांनी विविध युक्त्या वापरल्या पाहिजे इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत रिदम व चित्रांचा समावेश पुस्तकांमध्ये असतो पाचवी ते आठवी रिदम व चित्रांची संख्या कमी होऊन परिच्छेद संख्या वाढते इयत्ता दहावी व बारावी व पुढील शिक्षणात चित्र तसेच रिदम वाईज अभ्यास नसल्याने विद्यार्थ्यांना अभ्यास लक्षात राहत नाही मग विद्यार्थी पाठांतरावर भर देतात परंतु पाठांतर केलेला अभ्यास कायमस्वरूपी लक्षात राहत नाही याकरिता अभ्यास समजून विविध युक्त्या वापरून लक्षात ठेवला पाहिज यामुळे पायाभूत अभ्यास लक्षात राहुन विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडते याकरिता घोकंपट्टी न करता विद्यार्थ्यांनी अभ्यास समजून लक्षात ठेवण्यावर भर दिला पाहिजे असे प्रतिपादन मेमरी मास्टर ट्रेनर डॉ भगवान गाढे यांनी केले

भाग्यलक्ष्मी लॉन्स येथे तयारी अभ्यासाची या व्याख्यानाचे आयोजन रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्ती व्हॅली व चाटे इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता यावेळी रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्ती व्हॅली चे प्रेसिडेंट डॉक्टर संजू भटकर ट्रेझरर सुनील वानखेडे शारदा माध्यमिक विद्यालयाचे संचालक मिलिंद गाजरे आयआयटी व विविध स्पर्धा परीक्षांचे ट्रेनर गणेश गाढे चाटे इंग्लिश मीडियम स्कूल चे चेअरमन राहुल सोनार आदि उपस्थित होते
यावेळी डॉक्टर गाडे यांनी श्रोत्यांमधून अभ्यासक्रमातील विविध शब्द तसेच मोबाईलच्या नंबर मधील शेवटचे दोन अंक घेऊन ते लक्षात ठेवण्याची पद्धती याबाबतचे प्रात्यक्षिक करून दाखवले तसेच विद्यार्थ्यांमधील विविध समस्या व त्यावरील उपाय योजना बाबत माहिती सांगितली
सूत्र संचलन मुकेश कुयटे, विनोरिका फर्नांडिस, मिनी फर्नांडिस यांनी तर
आभार – अमिता जोशी यांनी मानले
कार्यक्रम यशस्वीतेसाठी चाटे इंग्लिश मीडियम स्कूल चे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले
विद्यार्थ्यांच्या समस्येकडे दुर्लक्ष करू नका
पालक म्हणून आपण विद्यार्थ्यांना अभ्यास कर असा नेहमी सल्ला देत असतो परंतु हा अभ्यास कसा करायचा तो लक्षात कसा ठेवायचा याबाबतचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना होत नाही त्यामुळे विद्यार्थी अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात तसेच अभ्यासासाठी त्यांच्यावर दबाव टाकल्यास ते अभ्यासाच्या प्रवाहातून बाहेर पडतात व मोबाईल मधील गेम खेळण्यात त्यांना आनंद वाढत असल्याने अभ्यासाकडे दुर्लक्ष होते यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांच्या समस्या समजून घेतल्या पाहिजे व त्यावरील उपाय योजना शोधल्या पाहिजेत
गणेश गाढे ट्रेनर स्पर्धा परीक्षा
विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या प्रवाहामध्ये आणले पाहिजे
गेल्या दोन वर्षापासून कोरोनाविषाणू च्या प्रवाहामुळे शाळा बंद होत्या यामुळे ऑनलाईन शिक्षण जरी मिळत असले तरी विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात मधून बाहेर पडला होता बरेच च्या विद्यार्थ्यांना मागील येत दिले शिक्षण याचा विसर पडला तर लिखाणाचा वेगही कमी झाला अशा विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे
डॉ. संजू भटकर प्रेसिडेंट रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्ती व्हॅली


