वरणगाव – आज उभे विश्व जरी करंगळीच्या इशाऱ्यावर संगणकाद्वारे क्षणार्धात आभासी संपर्कात शिक्षण साहित्य व माहितीचे आदान प्रदान करण्यात अग्रेसर झालं असलं, तरी समाजातील प्रत्येक घटकातील व्यक्ति विशेष क्षणार्धात संपर्कात आली असली तरी,आजही समाजात गुरुची आवश्यकता कमी झालेली नाही.म्हणून मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधत समाजातील समाज घटकातील एखाद्या समाजसेवी शिक्षकांचा सार्वजनिक गौरव म्हणजे गुरु शिष्य व भाषा या अभेद्य तर त्रिरत्नान्चा तो गौरव आहे.

, नुकताच शिवसेना जिल्हाप्रमुख व शिक्षक असलेले समाधान धर्मा महाजन(सर) यांचा “जय महाराष्ट्र वृत्तपत्र लेखक व कवी महासंघ मुंबई”यांच्या वतीने सन्मान मराठीचा गौरव महाराष्ट्राचा महाराष्ट्र स्वाभिमान गौरव पुरस्कार 2022 हा पुरस्कार प्राप्त झाला त्या निमित्त त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता चंद्रकांत हरी बढे यांच्या हस्ते समाधान महाजन यांना शाल श्रीफळ पुष्पहार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सहकार मित्र चंद्रकांत हरी बढे सर हे होते. याप्रसंगी प्रसंगी बढे सरांनी समाधान महाजन यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या अल्पसंख्यांक शिक्षक सेनेचे मुंबई अध्यक्ष इलियास शेख सर परिसरातील विलास मुळे ,हॅप्पी भाई ,संतोष निलेश ठाकूर ,सईद मुल्लाजी ,सुभाष चौधरी, सुरेश चौधरी ,निळकंठ सरोदे , विलास वंजारी ,सुनील देवघाटोळे , मोहसीन खान आनंदा माळी उमाकांत झांबरे ,बाळू माळी , यशवंत बडे, दीपक धनदवे, चेतन सराफ ,सुखदेव धनगर , कृष्णा पुजारी , गोविंदा चौधरी , नितीन पाटील , शिवा भोई , मनोज भोई , वकीलभाई वेल्डिंगवाले , पंकज चौधरी ,अशोक शर्मा , शिक्षक वृंद ह्या गोड सोहळ्यास उपस्थित होते.
या प्रसंगी आपल्या सत्काराला ऊत्तर देताना महाजन म्हणाले की सदरचा पुरस्कार म्हणजे माझ्या शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक यांनी केलेल्या कार्याची पावती आहे असेच सामाजिक कार्य आमच्या सर्वांच्या हातून घडत राहो आणि परमेश्वर आम्हाला सर्वांना शक्ती देवो आणि बोडे सर ज्येष्ठ समाजसेवक यांचे आम्हाला मार्गदर्शन लाभत राहो ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाने व बरोबरीच्या लोकांच्या सहकार्याने आम्ही असेच समाजसेवेसाठी कार्य कार्य राहू असे अभिवचन याप्रसंगी दिले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक शिवसेना शहर प्रमुख संतोष माळी यांनी केले तर आभारप्रदर्शन शहर प्रमुख नीलेश ठाकूर यांनी मानले.


