भुसावळ – जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथील 62 वर्षाच्या वृद्धाने आठ व सहा वर्षाच्या बालिकांवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्याने या घटने प्रकरणी धरणगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून वृद्धाला अटक करण्यात आली आहे.भुसावळात तेली समाजाच्यावतीने
या घटनेचा तिव्र निषेध व्यक्त करण्यात आला तसेच अत्याचार करणा-या नराधमला कडक शासन होण्याच्या मागणीसाठी भुसावळ तेली सामाजाच्यावतीने प्रदेश तेली महासंघ भुसावळ तालुकाअध्यक्ष गणेश सोनवणे यांचे नेतृत्वात तहसीलदार यांना बुधवार २३ रोजी निवेदन देण्यात आले.
नराधम आरोपीस फाशीची शिक्षा व्हावी – भुसावळ तेली समाजातर्फे एकमुखी मागणी
निवेदनात नमूद आहे की , धरणगाव येथे दोन लहान बालिकांवर चंदुलाल मराठे नामक नराधमाने अत्याचार केला. या घटनेचा समस्त तेली समाजाने धिक्कार व निषेध व्यक्त केला आहे. आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी एक मुखी मागणी करन्यात आली आहे . तसेच तेली समाज भुसावळ यांनी निवेदनात म्हटले आहे की , ही घटना अत्यंत निंदनीय, घृणास्पद व माणूसकीला काळीमा
फासणारी असून ह्या घटनेचा तेली समाज तिव्र निषेध व्यक्त करीत असून अश्या नराधमाला फाशीची
शिक्षा द्यावी, पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून खटला जलद गती न्यायालयात चालवावा,पिडीतेच्या परिवाराला शासनाच्या वतीने मदत जाहीर करावी अशी मागणी करीत आहोत. तसेच पिडीतेस महिला आरोपीचा मोठा मुलगा भुषण मराठे यानेही धमकविण्याचा प्रयत्न केला असून त्याचेवरही
कठोर कारवाई अशी मागणी तेली समाज भुसावळच्यावतीने करण्यात आली आहे . आरोपी
विरुध्द योग्य ती कारवाई न झाल्यास तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे .
निवेदन देण्याकरिता
भुसावळ शहर तेली समाज बांधव
गणेश सुरेश सोनवणे , अशोक नामदेव चौधरीं , बाळू शामराव चौधरीं , संजय श्रावण चौधरीं ,शंकर शिवराम चौधरीं , राकेश रामदास चौधरीं , गोपाळ बळीराम चौधरीं , विजय प्रकाश चौधरीं , सुधाकर श्रावण पाटिल , कैलास धोंडू चौधरीं , उज्वला बबनराव बागुल , सौ सुनिता सुधाकर पाटील , सौ रेखा योगेश धुपे , सौ सविता गणेश सोनवणे , सौ कांताबाई संजय चौधरीं , सौ गायत्री विजय चौधरीं, यांच्यासह समाजबांधव व महिला उपस्थित होत्या .



