शिवदर्शन सप्ताहात शिवरायांच्या विविधांगी गुणांचे सांगोपांग दर्शन :

भुसावळ – छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र विविध अंगाने उलगडून दाखवण्यासाठी आणि शिवरायांच्या विविध पैलूंचे दर्शन घडवण्याच्या हेतूने आयोजित करण्यात आलेल्या शिवदर्शन सप्ताहात महाराष्ट्रभरातील आठ व्याख्यात्यांनी छत्रपती शिवरायांच्या विविधांगी गुणांचे सांगोपांग दर्शन घडविले. ही सर्व व्याख्याने श्रोत्यांसाठी युट्युबवर उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भुसावळ येथील छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशीय संस्थेतर्फे आगळावेगळा शिवदर्शन सप्ताह ऑनलाईन व्याख्यानमाला दि. 14 ते 21 फेब्रुवारी दरम्यान पार पडली. प्रा. डॉ. गजानन महाराज वाव्हळ (पुणे) यांनी ‘तुकोबाराय आणि शिवराय’ या विषयावर व्याख्यान दिले. युवा शिवशाहीर अक्षय डोंगरे (नगर) यांनी शाहिरी पोवाड्यांचे गायन केले. शिवव्याख्याते रामेश्वर भदाणे (जळगाव) यांनी ‘राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ समजून घेताना’ या विषयावर, शिवचरित्रकार चंदन पवार (जळगाव) यांनी ‘शिवरायांची युद्धनिती’ या विषयावर, हभप गंगाधर महाराज कुरुंदकर (हिंगोली) यांनी ‘शिवरायांचा महिलाविषयक दृष्टिकोन’ या विषयावर, डॉ. स्वप्नील छाया विलास चौधरी (औरंगाबाद) यांनी ‘शिवछत्रपतींचा विचार हीच काळाची गरज’ या विषयावर, शिवकीर्तनकार हभप गणेश महाराज फरताळे (वढू बुद्रुक, पुणे) यांनी ‘छत्रपती शिवराय व आजचा समाज’ या विषयावर तर समारोपीय व्याख्यान महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांनी ‘स्वराज्य आणि धर्म’ या विषयावर श्रोत्यांशी संवाद साधला. यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष संजीव पाटील, समन्वयक डी. के. पाटील, शिवदर्शन सप्ताहाची संकल्पना मांडणारे डॉ. जगदीश पाटील, मनीषा ताडेकर, प्रमोद आठवले, अरूणा उदावंत, प्रा. निलेश गोरे, दीपाली भंगाळे, निशा पाटील, संजय ताडेकर, संध्या भोळे, अमितकुमार पाटील, जयश्री काळवीट, प्रा. डॉ. गिरीश कोळी, अनिता पाटील, श्यामकांत रूले, बी. बी. जोगी, प्रा. डॉ. दिलीप ललवाणी आदींनी परिश्रम घेतले.