नाहाटा महाविद्यालयात संत गाडगेबाबा जयंती उत्साहात साजरी :


भुसावळ( प्रतिनिधी ) – ताप्ती एज्युकेशन सोसायटी संचलीत भुसावळ कला, विज्ञान आणि पी. ओ. नाहाटा वाणिज्य, महाविद्यालय भुसावल येथील राष्ट्रीय सेवा योजना, मानव्य विद्याशाखा व मराठी विभाग अंतर्गत संत गाडगे महाराज यांची जयंती व गजानन महाराज प्रकट दिन साजरा करण्यात आला .
व्यासपीठावार कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य प्राध्यापक डॉ.एस.व्ही.पाटील, उपप्राचार्य प्रा. ए. डी. गोस्वामी, प्रमुख वक्ते प्राध्यापक डॉ. के. के.अहिरे व डॉ.दिपक शिरसाट (इतिहास विभाग), राज्यशात्र विभाग व रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ . राजेंद्र नाडेकर, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.ममताबेन पाटील, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. व्ही. एन. महिरे उपस्थिती होते. जयंती निमित्त श्री. संत गाड़गे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले.
प्रमुख वक़्ते प्रा. दीपक शिरसाट यांनी त्यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला व समाज प्रबोधनाची त्यांची भूमिका स्पष्ट केली. तसेच प्रा. डाँ.के.के.अहिरे यांनी गाडगे महाराज यांच्या बद्द्ल मनोगत व्यक्त केले. आपल्या मनोगतातून संत गाडगेबाबांचे विविध जीवनातील प्रसंग विज्ञानवाद व शिक्षणाबद्दलची तळमळ स्पष्ट केली.
अध्यक्षीय मनोगतातून उपप्राचार्य प्राध्यापक डॉ. एस. व्ही पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. केवळ जयंती पुरते त्यांचे विचार ऐकण्यापेक्षा ते अंगिकारणे महत्त्वाचे असल्याचे म्हटले.
प्रा. डॉ.आर. एस. नाडेकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रा. भूपेंद्र बाणाईत यांनी सूत्रसंचालन पार पाडले.
कार्यक्रमाला प्रा. एस.टी.धूम, प्रा.डॉ.जे.एफ.पाटील, डॉ.डी.एम.टेकाडे, प्रा.दीपक पाटील, प्रा. जितेंद्र अडोकार, प्रा. निनू झोपे डॉ. मनोज पाटील ‘ डॉ. राजेंद्र तायडे तसेच इतर प्राध्यापक बंधू-भगिनी उपस्थित होते. एनएसएसचे स्वयंसेवक व राज्यशास्त्र विभागाचे विद्यार्थी सागर सोनवणे, जयश्री पाटील, हर्षल चव्हाण, आकाश बाविस्कर, खुशाल मानकर, तारकेश्वरी सोनवणे, स्वप्निल डोळसे, आदित्य हिवरे हे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सौ.एम. व्ही. वायकोळे, उपप्राचार्य डॉ.एस. व्ही. पाटील, उपप्राचार्य बी. एच. बऱ्हाटे, व डॉ. एन. इ. भंगाळे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.