भुसावळ – येथील साईसेवक नगरसेवक तथा कोरोना योद्धा पिंटू कोठारी यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांची भेट घेऊन पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांनी प्रकृतीची विचारपूस केली.
गेल्या काही दिवसांपासून साईसेवक तथा नगरसेवक पिंटू कोठारी यांची प्रकृती बरी नसल्याने ते उपचार घेत आहेत. दरम्यान, भुसावळ नगरपरिषदेच्या विविध विकास कामांच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांनी साईसेवक पिंटू कोठारी यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होऊन पुन्हा कार्यात रममाण होण्याबाबत सदिच्छा दिल्या. यावेळी त्यांचेसमवेत अँड निर्मल दायमा यांचेसह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.



