स्व. निखिल खडसे स्मृतिचषक स्पर्धेचे सिनेअभिनेत्री श्रावणी गोस्वामी यांच्या प्रमुख उपस्थितित पारितोषिक वितरण :

भुसावळ – शहरातील डीएस ग्राऊंड मैदानावर स्व. निखिल खडसे स्मृतिचषक स्पर्धे सुरु असून , रविवार १३ रोजी या स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे. विजयी संघाना यावेळी पारितोषिक वितरण केले जाणार आहे.
या पारितोषिक वितरणप्रसंगी माजी मंत्री एकनाथराव खडसे, माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांच्या हस्ते विजयी संघाना पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे. तसेच सिनेअभिनेत्री श्रावणी गोस्वामी, फिल्म डायरेक्टर व निर्माते मानव सोहेल हे देखील याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत. तसेच या कार्यक्रमास खा. रक्षा खडसे, आ. संजय सावकारे, जेडीसीसी बँक माजी चेअरमन रोहिणी खडसे-खेवलकर, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील, माजी आमदार, गुरुमुख जगवाणी, माजी नगराध्यक्ष रमण भोळे, प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे, डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, मुख्याधिकारी संदिप चिद्रवार, प्रा. सुनील नेवे, तहसीलदार दीपक धिवरे, पोनि विलास शेंडे, पोनि विलास शेंडे, पोनि राहुल गायकवाड, डीआरएम एस. एस. केडीया, भुसावळ ऑर्डनन्स पॅâक्टरी जीएम वसंत निमजे, लेवा पाटील कुटुंबनायक रमेश विठू पाटील, माजी जिल्हा उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी सुधीर पाटील, नगरसेवक ललीत कोल्हे, मोहन फालक, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, माजी आ. दिलीप भोळे, माजी आ. निळू फालक, मार्वेâट कमिटी सभापती सचिन संतोष चौधरी, मोहन फालक, माजी नगरसेवक संतोष बारसे, शेख शफी शेख अजिज, रमेश मकासरे, माजी नगरसेवक संतोष त्र्यंबक चौधरी, पिंटू कोठारी, विजय चौधरी, मुन्ना तेली, राजू सुर्यवंशी, माजी उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, मनोज बियाणी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.