भुसावळात चाकू हल्ला :

भुसावळ – शहरातील बाजारपेठ हद्दीतील जामनेर रोड वर रात्री 9.30 वाजेच्या सुमारास काही अज्ञात इसमांनी एकावर चाकू हल्ला केल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली .

अधिक माहिती अशी की, शहरातील मुस्लिम कॉलनी भागातील रहिवासी गुलाम शहा कालू शहा वय 27 या तरुणावर जामनेर रोड येथे अज्ञात इसमांनी चाकूने वार केल्याची घटना घडली आहे.उपचारासाठी जखमी रुग्णास रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

<