सातवीच्या चिमुकल्या विद्यार्थिनींनी “सत्कृत्य ” अंतर्गत केला सोमनाथ परिसराचा काही भाग स्वच्छ : कार्याची दखल घेत डायटचे अधिकारी शैलेष पाटील यांनी घेतली भेट :

भुसावळ- येथील अहिल्यादेवी कन्या विद्यालयातील इयत्ता सातवी मध्ये शिकत असणाऱ्या रेश्मा विठ्ठल पाटील आकांक्षा विठ्ठल पाटील तसेच अक्षदा वाघ या विद्यार्थ्यांनी व आई सौ .लीना पाटील वन्य सहकाऱ्यांच्या वतीने जामनेर रोडवरील शिवशक्ती कॉलनी जवळील सोमनाथ नगर भागातील अतिशय अस्वच्छ असलेला भाग काट्या-कुट्या व कचरा यांनी भरलेला संपूर्ण परिसर 30 जानेवारी महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त शासनाच्या परिपत्रकानुसार शिक्षण ही मानवी जीवनावर दीर्घकाळ परिणाम करणारी प्रभावी प्रणाली आहे असे म्हणत नव्या तालीम च्या रूपाने देशाला शिक्षणाची देणगी देणाऱ्या महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांनी दिलेल्या 3H(Heart ,Hand and Head) मन मनगट मस्तक याचा विचार प्रत्येक शिक्षकांपर्यंत पोहोचावा शिक्षकांनी तो विद्यार्थ्यांमध्ये रुजवावा यासाठी विविध शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये इयत्ता सहावी ते आठवी त्या वर्गाच्या उपक्रम विषय ” सत्कृत्य “असा होता त्याअंतर्गत कार्यक्रमाचे स्वरूप स्वच्छता करणे स्वालंबन प्रामाणिकपणा नीटनेटकेपणा सर्वांच्या कामात मदत करणे या अंतर्गत शाळेच्या माननीय मुख्याध्यापिका मानसी कुलकर्णी पर्यवेक्षक संजीव पाटील व ज्येष्ठ शिक्षक नाना पाटील यांनी केलेल्या शासकीय परिपत्रकाच्या नुसार उपक्रम रुजवावा या हेतुने आवाहनानुसार सातवी च्या रेश्मा पाटील , आकांक्षा पाटील, अक्षदा वाघ यांनी आपल्या आई-वडिलांच्या सहकार्याने सोमनाथ नगर परिसर स्वच्छ केला खऱ्या अर्थाने महात्मा गांधींच्या स्वच्छतेचा संदेशाचे पालन करून प्रत्यक्ष कृती या मुलींनी केल्यामुळे जळगाव डायट चे अधिकारी प्रा . शैलेष पाटील यांनी त्यांचे पुस्तके देऊन अभिनंदन केले तर शिक्षक नाना पाटील यांनी वह्या व वृक्षाचे रोप देऊन कौतुक केले . त्या विद्यार्थिनीचे परिसरात कौतुक होत असून शालेय परिवाराने ही त्यांचे अभिनंदन करून कौतुक केले