भुसावळ रेल्वे स्कुलची तनुष्का साळवे हिचा महाव्यवस्थापक लाहोटी यांचे हस्ते सत्कार :


भुसावळ – येथील रेल्वे स्कूल मधील विद्यार्थिनी तनुष्का शरद साळवे हिने गेल्या वर्षी सन 2020-21 इयत्ता ११वी मध्ये (सीबीएससी बोर्ड) स्कुलमधून 97. 6 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला तीच्या या यशाबद्दल नुकताच मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांचे हस्ते सत्कार झाला .
स्थानिक डब्ल्यूएसएससी येथे वुमन वेलफेअर असोसिएशन तर्फे आयोजित कार्यक्रमात महाप्रबंधक अनिल कुमार लाहोटी यांचेसह डीआरएम एस एस केडिया, एडीआरएम नवीन पाटिल , एडीआरएम रुख्माया मीना ,सिनिअर डीपीओ एन डी गांगुर्डे, वेलफेअर अध्यक्षा श्रीमती श्रावंती नवीन पाटिल यांचे उपस्थितीत एक हजार रुपये रोख व प्रशस्तीपत्र देवून तनुष्का हिस सन्मानित करण्यात आले .
जी एम अवार्ड मिळाल्याबद्दल तनुष्का हिचे शाळेचे प्रिंसिपल सतिष कुळकर्णी , वर्ग शिक्षक , कोंचिंग सर दिपक झा , सुप्रभा आनंद, अध्यक्ष आनंद तायडे मामा , शरद किसन साळवे वडील , आई निरंजना साळवे तायडे शिक्षक यांचेसह रेल्वे ऑफिसर , सुभाष लोखंडे ( अभियंता) अतुल तायडे ( राउंड ऑफिसर रावेर) रिटायर्ड प्रिन्सिपल अँड खान सर, तिकीट तपासनीस विलास आठवले , श्रीधर साळवे ( मुंबई) सुरेश पहेलवान डॉ. वंदना वाघचौरे ,भुसावळ वकिल संघ महिला अध्यक्षा अँड जास्वंदी भंडारी ,पत्रकार उज्वला बागुल , महिला दक्षता व समुपदेशन भारती म्हस्के , अंजुम खान , सौ संगीता भामरे , जयश्री इंगळे , राजश्री सोनवणे , पीआरपी जगन सोनवणे , राजेंद्र तायडे (सेठ ) , आदिनी पुढील वाटचालीस शुभेच्छा देवून अभिनंदन केले आहे . तनुष्का ही रेल्वे स्कूल मधील इयत्ता 1 ली पासून टॉपर विद्याथिनी असून आपल्या यशाचे श्रेय शिक्षकवृन्द व आई वडील यांना देते .