वरणगाव – वरणगाव ते दर्यापूर महात्मा फुले नगराजवळील पुलाचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरु असल्याने शिवसेना स्टाईलने वरणगाव शहर शिवसेनेने हे काम बंद पाडून ईस्टीमेट प्रमाणे उत्कृष्ट काम करा असा इशारा शिवसेनेतर्फे संबधित ठेकेदाराला शनिवारी आज देण्यात आला.

याबाबत माहिती अशी की, वरणगाव फॅक्टरी रस्त्यावरील महात्मा फुले नगरमार्ग दर्यापूर महामार्गवर जाणारा मुख्य रस्तावरील पाण्याच्या हौदाजवडील पूलाचे काम सुरु आहे. परंतु या पुलाचे काम अतिशय निकृष्टपणे सुरु असल्याची माहिती तेथील नागरिकांनी शिवसेना शहरप्रमुख संतोष माळी यांच्या निदर्शनास आणून दिली.
आज शनिवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास शहरप्रमुख संतोष माळी यांच्यासह विलास मुळे, हिप्पी शेठ, निलेश ठाकूर यांनी प्रत्यक्ष जाऊन सुरु असलेल्या पुलाची पाहणी केली असता त्या ठिकाणी अतिशय निकृष्ट पद्धतीने त्या पुलाचे काम सुरु आहे. जे मोठे पाईप टाकले गेले आहे ते एस्टीमेट पद्धतीने टाकले गेलेले नाही आहे. अगोदर त्या ठिकाणी पूर्वीपासून असलेला नाला सहा फूट खोल रुंदीचा होता पण आता तो पूर्णपणे मातीने बुजला गेला आहे. नवीन टाकलेले पाईप हे खाली टाकले असल्याने त्या पाईपाची उंची खाली स्लॅप टाकून वाढविण्यात यावी. तसेच जोपर्यंत हा पुल होत नाही तोपर्यंत बाजूच्या रस्त्यावर खडी टाकून रस्ता पक्का करण्यात यावा. त्या ठिकाणी रस्त्यावरील जाणारे येणारे वाहधारक त्या ठिकाणी चिकलात पडतात. शुक्रवारी रात्री त्या पाईपच्या खड्यात चार महिला पडल्या होत्या. त्यांना कुठलीही जीवितहानी झाली नाही.
या पुलाचे काम चांगले एस्टीमेट प्रमाणे करा अन्यथा शिवेसेनेतर्फे हे काम पूर्ण बंद पाडण्यात येईल असा इशारा वरणगाव शिवसेनेचे शहर प्रमुख संतोष माळी यांच्यासह दक्षिणचे शहर प्रमुख निलेश ठाकूर, जिल्हा संघटक विलास मुळे, अल्पसंख्यांक नेते हिप्पी शेठ,सईद मुल्लाजी, शहर संघटक भूषण चौधरी, शेख सुफियान, राहुल वंजारी, सागर वंजारी यांनी यावेळी दिला.


