भुसावळ शहरातील आरोपींवर पोलिसांची करडी नजर : शहरातील आरोपींची पोलिसांनी घेतली ओळख परेड :

भुसावळ – शहरातील आरोपींची आज घेतली ओळखपरेड : पोलिस
भुसावळ शहर पोलीस स्टेशन, भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन यांच्या हद्दीतील जबरी चोरी त्याप्रमाणेच शस्त्र अधिनियमा खालील अर्थात यापूर्वी ज्या आरोपींकडे देसी कट्टा आणि हत्यारे मिळून आली अशा रेकॉर्डवरील गुन्हेगारांची आज सकाळी साडेअकरा ते दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान भुसावळ शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी ओळख परेड करून घेण्यात आली.
सदर ओळख परेड मध्ये भुसावळ शहर पोलीस स्टेशन हद्दीतील एकूण 11 आरोपी व भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील एकूण 21 आरोपी याप्रमाणे 32 आरोपी हजर ठेवण्यात आले होते.

सदर आरोपींची सविस्तर चौकशी करून विचारपुस फॉर्म इंट्रोगेशन फॉर्म भरून घेण्यात आले. त्यामध्ये सदर आरोपी सध्या स्थिती मध्ये काय करतो? कोणते वाहन वापरतो? कोठे राहतो? त्याचे मित्र कोण आहेत? कोणते काम करतो? कामाचे स्वरूप काय? त्यातून त्याला किती रक्कम मिळते? सध्या सध्याचा वापरता मोबाईल कोणता? आदी सर्व बाबींची सविस्तर माहिती घेण्यात आली. याशिवाय त्यांच्याकडून शहरातील अन्य सक्रिय असणाऱ्या गुन्हेगारांची देखील विचारपूस करून माहिती घेण्यात आलेली आहे. सदरच्या चौकशी मधून काही सक्रीय गुन्हेगारांची नावे उघड झाले असून त्यांच्यावर पोलीस लक्ष ठेवून आहेत. मागील वर्षीच आरोपी यांचा वेगवेगळ्या हेड खाली गुन्हे करणाऱ्या आरोपी यांच्या याद्या तयार करण्यात आलेल्या आहे. त्यामध्ये घरफोडी करणारे आरोपी, जबरी चोरी करणारे आरोपी,वाहन चोरी करणारे आरोपी, देशी कट्टा बाळगणारे आरोपी, अशा वेगवेगळ्या हेड खाली केलेल्या या याद्या मधून आज रोजी जबरी चोरी करणारे व शस्त्र अधिनियमाखालील रेकॉर्डवरील आरोपी बोलावण्यात आले होते.

शहरात भविष्यामध्ये घडणाऱ्या जबरी चोरीच्या घटनांना आळा बसावा त्याच प्रमाने अग्नी शस्त्राच्या वापरला आळा बसावा या दृष्टीनं सदरची ओळख करून घेण्यात आली होती. यातील आरोपी त्यांना चांगल्या वर्तनाची समज देण्यात आली. तसेच आवश्यक त्यांच्यावर चाप्टर केस देखील करण्यात येत आहे.

सदरची कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार पेठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड ,शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पडघण यांच्या अधिपत्या खाली गुन्हे शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांच्या मार्फतीने करण्यात आली आहे.