भुसावळात भारतीय प्रजासत्ताक दिन विविध कार्यक्रमानी उत्साहात व आनंदाने साजरा :

भुसावळ -भारतीय प्रजासत्ताक दिन शहर व परिसरात विविध कार्यक्रमानी उत्साहात व आनंदाने साजरा करण्यात आला . यानिमित्त शासकीय , निमशासकीय कार्यालयांसह रेल्वे ,ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ , शाळा , महाविद्यालय , खाजगी संस्था , यासह विविध राजकीय पक्ष कार्यालये येथे ध्वजवंदन करून अभिवादन करण्यात आले.

शासकीय ध्वजवंदन
स्थानिक डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदान येथे शासकीय ध्वजवंदन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. प्रसंगी प्रांताधिकारी रामसिंग सुलाने यांचे हस्ते तिरंगा ध्वज फडकविण्यात आला . यावेळी आमदार संजय सावकारे, तहसीलदार संदिप धिवरे ,मुख्याधिकारी संदिप चिद्रवार ,नायब तहसीलदार इंगळे , गट विकास अधिकारी विलास भटकर , गटशिक्षणाधिकारी तसेच पालिकेचे युवराज लोणारी ,राजेंद्र नाटकर ,आशिक खान , नगरसेवक मुकेश गुंजाळ , प्रा सुनील नेवे , जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते जे बी कोटेचा , मुन्ना सोनवणे , सिद्धार्थ जाधव , विजय सावळे,,सुदाम सोनवणे, राजू खरारे ,अर्जुना संघटनेचे संस्था अध्यक्ष नंदकिशोर पंड्या,नरवीरसिग रावळ, सचिव रवींद्र पाटील, योगिनी चौधरी,आकाश चौधरी,अनिल भिंगाने,रोहित श्रीवास्तव,आदी उपस्थित होते . पालिकेचे ब्रैंड अम्बेसेडर रणजीत राजपूत ,व उपविभागीय कार्यालय तहसील कार्यालय , पालिकेचे अधिकारी व कर्मचारी पोलिसा विभागाचे पोलिस निरीक्षक पड़घन बाजार पेठ निरीक्षक, राहुल गायकवाड़ , पोलिस अधिकारी व कर्मचारी होमगार्ड बैंड पथक उपस्थित होते
ध्वजवंदन नंतर जेष्ठ नागरिक व स्वातंत्र्य सैनिक यांचा सत्कार करण्यात आला तसेच पालिका रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ कीर्ती फलटणकर यांचेसह अन्य 7 जणांचा कोरोना योद्धा म्हणून आ संजय सावकारे यांचे हस्ते प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला .
दरम्यान अर्जुना संघटनेने उभारलेल्या शहीद वीर जवान यांचे स्मारकास मान्यवरांसह उपस्थितांनी पुष्पांजली अर्पण करुन श्रद्धाजंली वाहून अभिवादन करण्यात आले

भुसावळ पालिका ध्वजारोहण व अन्नदान :
कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करीत प्रशासक रामसिंग सुलाने यांचे हस्ते भुसावळ नगर्परिषदेत ध्वजवंदन करण्यात आले . यावेळी मुख्याधिकारी संदीप चिदवार , पाणी पुरवठा सभापती , सार्वजनिक बांधकाम समिती सभापती , शिक्षण समिती सभापती , महिला बाल कल्याण समितीच्या तसेच आरोग्य समिती सभापती सर्व नगरसेवक यांचेसह पालिकेचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते .
ध्वजवंदन नंतर पालिका परिसरातील गरीब गरजुना अन्नदान (भोजन ) देण्यात आले .