मध्य रेल्वे भुसावळ विभागातील मनमाड – भुसावळ विभागाचा महाव्यवस्थापकांचा वार्षिक निरिक्षण दौरा: मनमाड-नांदगाव विभागात घेतली १३० किमी हाय-स्पीड ट्रायल :

भुसावळ -मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी, यांनी दिनांक २८ रोजी भुसावळ विभागातील मनमाड-भुसावळ विभागाची वार्षिक निरिक्षण केले.

महाव्यवस्थापकांनी मनमाड-नांदगाव विभागात ताशी १३० की मी हाय-स्पीड ट्रायल घेऊन निरिक्षण दौ-याची सुरूवात केली आणि त्यानंतर नांदगाव स्थानकांतील नवीन पादचारी पूल (फूट ओव्हर ब्रिज), नवीन बुकिंग ऑफिस, सर्क्युलेटिंग एरिया, क्रू लॉबी, रनिंग रूम, गुड्स शेड, आरपीएफ चौकी आणि आरोग्य युनिटची पाहणी केली. त्यांनी सेफ्टी बुलेटिन, राजभाषा मासिक ‘ताप्ती’, विविध वापरकर्ता पुस्तिका, नांदगाव येथील कर्मचाऱ्यांच्या वापरासाठी मार्गदर्शक तत्त्वेही जारी केली.

अनिलकुमार लाहोटी यांनी पिंपरखेड येथील गँग युनिट आणि ट्रॅक्शन सब स्टेशनची पाहणी केली, त्यानंतर नायडोंगरी – हिरापूर सेक्शनवरील कर्व आणि गँग युनिटची पाहणी केली. चाळीसगाव – वागली सेक्शनवरील लेव्हल क्रॉसिंग गेटची तपासणी, वागळी – कजगाव सेक्शनवरील मर्यादित उंचीच्या सबवेची पाहणी केली. त्यांनी काजगाव स्थानकाची अचानक पाहणी केली. यानंतर त्यांनी नगरदेवळा-गलाण विभागावरील तितूर गर्डर पूल, पाचोरा स्थानकावरील रेल्वे कॉलनी, ओएचई डेपो, आरोग्य युनिट आणि पॅनेल रूमचीही त्यांनी पाहणी केली.

महाव्यवस्थापकांनी नवीन रनिंग रूमची पाहणी करून भुसावळ येथील रेल हेरिटेज म्युझियमला भेट दिली.

भुसावळ येथे लाहोटी यांनी आमदार संजय सावकारे यांची भेट घेतली आणि रेल्वेशी संबंधित समस्यांवर चर्चा केली. त्यांनी लोकप्रतिनिधी, मान्यताप्राप्त संघटना आणि व्यापारी संस्थांशी संवाद साधला आणि माध्यमांच्या प्रतिनिधींना संबोधित केले.

२०२०-२१ या वर्षातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांनी पात्र रेल्वे कर्मचाऱ्यांना महाव्यवस्थापक पुरस्काराने सन्मानित केले.

या निरिक्षण दौऱ्यात भुसावळ विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक एस. एस. केडिया, विभागाचे प्रमुख व इतर अधिकारी उपस्थित होते.

निरिक्षण दौऱ्यात सर्व कोविड-१९ प्रोटोकॉल पाळण्यात आले.