भुसावळ शहरातील हुडको कॉलनीत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा :


  • भुसावळ शहरातील रानातील महादेव मंदिर येथील हुडको कॉलोनीत कॉलनीवासी व अर्जुना संस्था यांच्या वतीने प्रजासत्तादिन साजरा करण्यात आला . सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील ज्येष्ठ माता श्रीमती मनकर्णा बाई देवकर ( वय 82 ) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . तसेच भारतमाता पुजन व पद्मभुषण स्वातंत्र्यसेनानी राणी गाईदिन्ल्यु यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पुजन करण्यात आले.
  • याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ.किर्ती फलटणकरांची उपस्थिती होती त्यांनी परिसरातील नागरिकांना ओमिक्रॉम किंवा तिसरी लाट याला घाबरून न जाता व्यायाम , योग ,योग्य आहार यांची त्रिसूत्री सांभाळून काळजी जर घेतली तब्येत निरोगी राहील .लसीकरण किती महत्त्वाचे व आवश्यक आहे हे ही समजून सांगुन मार्गदर्शन केले. ध्वजारोहणासाठी , अर्जुना संघटनेचे पदाधिकारी श्री नारायण घोडके,होमगार्ड चे तालुका समादेशक
    श्री विश्वनाथ खरे , महाराणा प्रताप विद्यालयाचे व कॉलनीचे विद्यार्थी, ॲंड.जास्वंदी भंडारी (पाटील), कॉलनीतील माता भगिनी, बांधव उपस्थित होते.
    कार्यक्रमासाठी
    मंगेश पाटील , धर्मराज देवकर, सतिष खडायते ,हिमांशू राणे अंकित सरोदे, साहिल भिरुड , आनंद बाविस्कर आणि सर्व कार्यकर्त्यानी परिश्रम घेतले