कठिण परिस्थितीत पण खंबीर असते ती स्त्री – न्यायधीश शेख आरिफ .


भुसावळ – यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचां महत्वपूर्ण वाटा असतो. कधी आई , पत्नी , बहिण ,यासह विविध नात्यांची गुंफण हे त्या यशाचे गमक असते . आपल्या दैनंदिन खड़तर कार्यातुन कुटुंब सांभाळून सुद्धा ती जिद्द व मेहनतीने समाजकार्याकरीता सुद्धा वेळ काढते हे कार्य फक्त एक स्त्रीच करु शकते असे मत जळगाव येथील न्यायधीश आरिफ शेख यांनी व्यक्त केले .
येथील आय एम ए हॉल येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व अनुषी महिला बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतिज्योति सावित्री माईची आदर्श लेक सन्मान सोहळा 2022 चे उद्घाटन न्यायधीश आरिफ शेख यांचे हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी डॉ सुवर्णा गाढेकर , बहुउद्देशीय संस्थेच्या सौ अरुणा इंगळे , सौ कोल्हे , सौ राजश्री नेवे ,सौ भारती म्हस्के ,सौ संगीता भामरे , वेटलिफ्टर छोटू खान , सौ संगीता सोनवणे , यांचेसह मान्यवर उपस्थित होते .
यावेळी प्रास्ताविकात सौ जयश्री इंगळे यांनी संस्थेचे कार्य व माहीती देवून सावित्रीमाई यांनी सहन केलेल्या त्रासाची जाणीव प्रत्येक स्त्रीने ठेवून त्यांच्या ऋणात सदैव राहावे असे आवाहन यावेळी केले तसेच अन्यायग्रस्त महिलेस न्याय मिळावा यासाठी संस्था नेहमी पुढे असेल अशी ग्वाही यावेळी दिली.
शहरासह जिल्ह्यातील विविध भागात समाजकार्यात योगदान देणाऱ्या कर्तुत्ववान महिलांच्या कार्याचा सावित्रीमाई रत्न पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला . या पुरस्कारात सन्मानार्थी यांना अनुश्री संस्थेच्यावतीने प्रमाणपत्र , सावित्रीमाई यांची प्रतिमा व पैठणी देवून सत्कार करण्यात आला .
यामध्ये लक्षणीय बाब म्हणजे 90 वर्षाच्या जेष्ठ आजीच्या कार्याची दखल अनुश्री संस्थेने घेत डॉक्टर्स , महिलांच्या रक्षणार्थ सदैव तत्पर असलेल्या महिला पोलिस कर्मचारी , नर्स , आशा वर्कर , वकिल , पत्रकार , यासह समाजात विविधांगी कार्य करणाऱ्या शेकडो भागिनीचा सन्मान करण्यात आला .
अनुश्री महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ जयश्री इंगळे यांनी पुढाकार घेवून महिलांना एका व्यासपीठावर आणून सन्मान केल्याने सन्मानाने भारावलेल्या पुरस्कारार्थी महिलानी आयोजकांचे मनःपूर्वक कौतुक करून धन्यवाद देत मनोगत व्यक्त केले .
अतिशय सुंदर व आपल्या खुमासदार शैलीत शिक्षिका अंजुम खान यांनी सूत्रसंचालन केले तर आभार भारती म्हस्के यांनी मानले .
अनुश्री महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ जयश्री इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली
कार्यक्रम यशस्वितेसाठी अनुश्री मंडळ सचिव सौ वंदना जोगदंड ,तसेच सर्व नियोजन समिती सदस्य यांचेसह अन्य सहकारि संस्था अध्यक्षा भगिनी यांनी परिश्रम घेतले .