भुसावळ – भुसावळ नगरपालिकेत गेल्या काही दिवसांपूर्वी तालुक्याचे आमदार संजय सावकारे यांनी अमृत योजनेसंदर्भात नुकतीच एक बैठक घेतली त्या बैठकीला प्रशासकीय अधिकारी मुख्य अधिकारी विभागीय अधिकारी यांची मते जाणून घेतली त्यानुसार भुसावळ येथील अमृत योजनेसाठी निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणी दूर व्हाव्यात तसेच अमृत योजने संदर्भातील विविध प्रश्न मार्गी लावावे व योजनेला गती मिळावी यासाठी आमदार संजय सावकारे यांनी घदिनांक 27 जानेवारी रोजी मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन त्यांना अमृत योजनेसंदर्भात मंत्रालयात विस्तृत बैठक लावावी व भुसावळ येथील पाणीपुरवठा योजनेला गती मिळावी यासंदर्भात भुसावळ तालुक्याचे आमदार संजय सावकारे यांनी एका पत्राद्वारे पालकमंत्री निवेदन दिले असून त्यावरून मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्वरित बैठक लावण्याचे आश्वासन आमदार यांना दिलेले आहे त्यामुळे भुसावळ शहरातील पाणीपुरवठा योजना लवकरच कार्यान्वित होईल असा विश्वास आमदार संजय सावकारे यांनी व्यक्त केलेला आहे
प्रसंगी पालकमंत्री पाटील यांनी साकेगाव कंडारी गावासाठी मंजूर असलेल्या जल जीवन मिशन योजनेचे तांत्रिक मान्यता पत्र आमदार संजय सावकारे यांना सुपूर्द केले व योजना उत्कृष्टरित्या राबवली जाईल असा विश्वास प्रसंगी आमदार सावकारे यांनी व्यक्त केला आहे



