भुसावळ – येथील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला. ध्वजारोहण हिन्दी सेवा मंडळाच्या सचिव एम.डी.शर्मा ह्यांच्या हस्ते झाले. ह्या वेळेसच्या कार्यक्रमादरम्यान संपूर्ण महाविद्यालयाच्या परिसरात अभूतपूर्व असे उत्साहाचे वातावरण होते आणि त्यासाठी प्रजासत्ताकदिनाच्या बरोबरीनेच कारण होते ते म्हणजे महाविद्यालयाच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिंनींना बहुराष्ट्रीय उद्योगांकडून मिळालेल्या उच्च पगाराच्या नौकरीच्या ऑफर मुळे.
मागील साधारण तीन महिन्यांदरम्यान महाविद्यालयातील अकरा विद्यार्थी टी.सी.एस., सात विद्यार्थी कॅप जेमिनी, इन्फोसिस, हेक्सावेयर,हिताची आणि बायजू मध्ये प्रत्येकी दोन, टाटा कंसल्टिंग इंजीनियर्स मध्ये तीन, तसेच अॅमडोक्स, एटॉस सिंटेल, माइंडट्री, कॉग्निझंट, विप्रो,एम्फसिस,के.पी.आय.टी ह्या कंपनीजमध्ये साडेतीन लाख ते अधिकतम साडे बारालाखाचे पॅकेज मिळवून देत विद्यार्थी आणि विद्यार्थिंनींचे प्लेसमेंट करण्यात महाविद्यालयाला यश मिळाले. ह्या सर्व विद्यार्थ्यांचा गौरव प्रजासत्ताक दिनादरम्यान करण्यात आला.
गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात पुस्तकी ज्ञानच नव्हे तर आधुनिक उद्योगांच्या अपेक्षा आणि तंत्रज्ञान बदल याकडे बारीक लक्ष पुरवत अष्टपैलू अभियंता घडवण्याकडे कल असतो आणि ह्या प्रयत्नातूनच आम्ही हे घवघवीत यश मिळवू शकलो असे अधिकतम साडे बारालाखाचे पॅकेज मिळालेल्या सोहेल कच्छी याने सांगितले.
“बहुराष्ट्रीय कंपन्यांनी महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेवर विश्वास दाखवत त्यांना आपल्या जगभरातील विविध ठिकाणी सामावून घेतले ही अभिमानाची बाब आहे. आमच्या महाविद्यालाच्या दूरगामी शैक्षणिक धोरणांतर्गत केवळ पुस्तकी ज्ञानच नव्हे तर आधुनिक उद्योगांच्या अपेक्षा आणि तंत्रज्ञान बदल याकडे बारीक लक्ष पुरवत अष्टपैलू अभियंता घडवण्याकडे आमचा कल असतो आणि ह्याच विचारांचा परिपाक म्हणजे आमच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मनुष्य बळावर औद्योगिक क्षेत्राने दाखवलेला सार्थ विश्वास” असे प्रतिपादन ह्या प्रसंगी प्राचार्य डॉ. राहुल बारजिभे यांनी केले. “महाविद्यालयाने आता फक्त अंतिम वर्षाच्याच नाही तर तृतीय वर्षापासूनच विद्यार्थ्यांना नौकरीची ऑफर उपलब्ध करून देण्याचे ठरवले असून अनेक अग्रमानांकीत कंपनीजशी ह्या अनुषंगाने करार करण्यात आले आहेत” असे त्यांनी सांगितले. ”
सदर उपक्रमासाठी महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर राममोहन अग्रवाल, डॉ.श्रीकांत चौधरी, गजानन पाटील, जयेश महाजन, गिरीश सोनवणे, डॉ.नीता नेमाडे, मनीष माटा, गौरव टेंभुर्णीकर, डॉ. वाय.जी. परदेशी, सचिन हरीमकर, अभिजीत इंगळे यांनी मेहनत घेतली.
हिन्दी सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ. रविकान्त परदेशी, सचिव एम.डी.शर्मा, कार्याध्यक्ष सत्यनारायण गोडयाले कोशाध्यक्ष एम.डी.तिवारी, रमेश नागराणी, संजय नाहटा, बिसेन अग्रवाल,पंकज संड,अॅड.एस.के.जोशी,आरती भारद्वाज, विभागप्रमुख डॉ. गिरीश कुलकर्णी, प्रा.अविनाश पाटील, डॉ. एस.बी. ओझा, डॉ.पंकज भंगाळे, डॉ..ए.पी.चौधरी, डॉ.डी.डी.पाटील यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.



