गणरायाची मुर्ती विसर्जनासाठी द्या आणि त्या बदल्यात फळाचे वृक्ष घ्या एक अनोखा उपक्रमास उस्फूर्त प्रतिसाद :कदाचित महाराष्ट्रील पहिलाच अनोखा उपक्रम: नाना पाटील सर यांची संकल्पना :


भुसावळ- येथील गणेश विसर्जनाच्या निमित्ताने नगरपरिषद भुसावळ व पोलिस प्रशासनाच्या माध्यमातून कोरोना व इतर दुष्परिणाम होऊ नये म्हणून विविध ठिकाणी गणरायाच्या मूर्तीचे संकलन करण्यात येणार आहे . गणरायाची मुर्ती द्या व फळाचे वृक्षरोप भेट घ्या हा उपक्रम मुख्याधिकारी संदीपजी चिद्रेवार यांच्या मार्गदर्शन खाली भुसावळ मधील ” श्री रिदम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, हार्ट,ट्रामा आणि डायलिसिस सेंटर ” व निसर्ग पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे जिल्हाध्यक्ष नाना पाटील सर ,रघुनाथआप्पा सोनवणे यांच्या सहकार्याने एक उपक्रम राबविण्यात आला त्याला नागरिकांनी उत्सफुर्त प्रतिसाद दिला .२१० गणेश मूर्ती संकलन झाले तर १८४ गणेश भाविकांनि फळ झाडे स्विकारली.

मुन्सिपल हायस्कूल जामनेर रोड भुसावळ या ठिकाणी गणरायाची मूर्ती संकलनासाठी दिल्या त्या कुटुंबाला एक फळाचे झाड भेट देण्यात आले . त्या झाडाचे वर्षभर संगोपन आणि संवर्धन करणाऱ्या कुटुंबातील व्यक्तीचे पुढील वर्षी गणेशाच्या आगमनाच्या वेळी सत्कार करण्याचा नियोजन करण्यात आले .
जास्तीत जास्त मंडळांनी आणि घरगुती गणेश बसणाऱ्या भक्तांनी आपल्या मूर्ती मुन्सिपल हायस्कूल जामनेर रोड या संकलन केंद्रावर जमा कराव्यात आणि त्याबदल्यात वृक्ष भेट घ्यावे असे आवाहन नाना पाटील सर यांनी केले होते त्याचप्रमाणे श्री रिदम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. गणेश पाटील,डॉ. अमोल पाटील,डॉ. नितीन पाटील, डॉ. लक्ष्मीकांत नागला,डॉ. महेश पांगळे ,डॉ. कुशल पाटील व श्री रिदम मेडिकलचे संचालक गौतमजी चोरडिया यांनी केले होते.
तसेच नगर परिषदेचे कर्मचारी चंद्रकांत येवले राजेंद्र पाटील . पोलीस विभागाचे राजेंद्र पाटील मूर्ती संकलन केंद्रात सक्रिय होते .
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री संजय गाडेकर श्री ज्ञानेश्वर घुले सुरेंद्र सिंग पाटील गिरीश भंगाळे यांनी परिश्रम घेतले .

उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी दिला घरगुती गणेश
या उपक्रमाला सहभाग देत उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी स्वतः त्यांच्या घरी बसविलेल्या श्री गणेशाची मूर्ती या मूर्ती संकलन केंद्रात जमा करून उपक्रमास सुरुवात केली यावेळी ती मुर्ती मुख्याधिकारी यांनी संकलन केली . यावेळी आयोजक नाना पाटील यांनी फळ झाड भेट दिले . या प्रसंगी भुसावळ नगर परिषदेचे मुख्याधिकारी संदिप चिद्रेवार यांनी देखील उपस्थिती दिली. यावेळी श्री रिदम हॉस्पिटलचे डॉ. लक्ष्मीकांत नागला , गौतम चोरडिया व पर्यावरण प्रेमी उपस्थित होते . त्याचप्रमाणे नःपा चे इंजिनिअर गौरव जी अहिरे शी लोकेश ढाके आरोग्य अधिकारी श्री वसंत राठोड यांचे ही या उपक्रमास सहकार्य लाभले या उपक्रमास सर्व पत्रकार बंधू देखील उपस्थित होते . कदाचित महाराष्ट्रात असा अनोखा उपक्रम पहिलाच असू शकतो यांची सर्वत्र चर्चा होती