भुसावळ - तालुक्यातील कंडारी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.सुवर्णा नितीन कोळी.यांनी ग्रामपंचायत, मलमत्ता कराची रक्कम मुदतीत भरणा न केल्याने जिल्हाधिकार्यांनी त्यांना सरपंच व ग्रामपंचायत सदस्य पदावरून अपात्र केले.
जानेवारी 2021 ला ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत महिला सर्वसाधारण या प्रवर्गातून निवडून येऊन अनुसूचित जमाती या राखीव असलेल्या प्रवर्गातील सरपंच पदावर विराजमान झाल्या.अनुसूचित जमातींसाठी गावात एकच राखीव जागा असल्याने या जागेवर एकमेव उमेदवार दिपक रमेश तायडे हे निवडून आलेले होते.त्यामुळे ते सरपंच पदासाठी एकमेव मुख्य दावेदार होते.परंतु सौ.सुवर्णा नितीन कोळी यांचेकडे सुद्धा टोकरे कोळी जातीचा दाखला असल्याने त्या सरपंच पदावर 8 विरुद्ध 9 मतांनी विजयी झाल्या.
त्यामुळे दिपक रमेश तायडे यांनी त्यांचे विरोधात सार्वत्रिक निवडणूकीचे नामनिर्देशन पत्र भरतांना,मुदतीत घरपट्टी न भरल्यामुळे त्यांना सरपंच व सदस्य पदावरून अपात्र करण्यासाठी जिल्हाधिकारी जळगांव यांचेकडे दि.23/3/2021 रोजी अर्ज दाखल केलेला होता.सदरील अर्जाची चौकशी करून मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.जळगांव यांनी 9/6/2021 रोजी चौकशी अहवाल जिल्हाधिकारी यांना पाठवला.त्यानुसार जिल्हाधिकार्यांनी आपल्या दालनात तारखेनुसार कामकाज चालविले.त्यावेळी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 कलम 14 (1) ह प्रमाणे एखाद्या व्यक्तीला जर निवडणुकीत उमेदवारी करायची असेल तर नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचे एक दिवस आधी शासकीय कराचा भरणा करवा.आणि ज्या दिवशी नामनिर्देशन पत्र दाखल केले त्याचदिवशी जर कराचा भरणा केलेला असेल तर त्या दिवशी तुम्ही थकबाकीदार आहात हे सिद्ध होते.मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयाचा हवाला देऊन अर्जदाराच्या वकीलांनी युक्तिवाद केला.दि. 29/6/2021 रोजी अंतिम सुनावणी घेऊन निकालासाठी प्रकरण बंद केले.आणि दि. 21/9/2021 रोजी जिल्हाधिकारी जळगांव यांनी निर्णय देऊन.सौ. सुवर्णा नितीन कोळी यांना ग्रा.पं.सदस्य तसेच सरपंच पदावरून अपात्र केले.
यावेळी अर्जदार दिपक रमेश तायडे यांचेकडून अँड. हरीश पाटील यांनी तर सौ. सुवर्णा नितीन कोळी यांचे कडून अँड. धनराज मगर यांनी युक्तिवाद केला.