नशिराबाद टोलनाका येथे स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार देण्यात यावा व परीसरातील वाहनधारकांना टोल मुक्त करावे – जिल्हा काँग्रेस कमिटी अनु जाती विभागाच्या वतीने मागणी ; राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे व्यवस्थापक यांना निवेदन :


भुसावळ – जळगांव जिल्हा काँग्रेस कमिटी अनु जाती विभागाच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे व्यवस्थापक यांचेशी आज दिनांक २२ /०९/२०२१ रोजी
नशिराबाद टोल नाका येथे स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार देण्यात यावा व परीसरातील वाहन धारकांना टोल मुक्त करावे या मागण्यांसंदर्भात चर्चा करून निवेदन देण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष योगेंद्रसिंग पाटील, काँग्रेस अनु जाती विभागाचे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष विवेक नरवाडे,तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष इस्माईल गवळी, युवक काँग्रेसचे नितिन पटाव ,खान्देश ठेवीदार संघटनेचे प्रविण पाटील, भुसावळ काँग्रेस अनु जाती विभागाचे शहराध्यक्ष सुनिल जोहरे, उपाध्यक्ष सागर कुरेशी व काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.