मुक्ताईनगर – केंद्रीय मानवाधिकार संघटना नवी दिल्लीची उत्तर महाराष्ट्र कार्यकारिणीची बैठक येथील शासकीय विश्रामगृहावर झाली. अध्यक्षस्थानी राष्ट्रीय संघटन सचिव डॉ. शिवचरण उज्जैनकर होते. यावेळी उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी राजेश पोतदार यांची निवड करण्यात आली.
बैठकीस प्रा. बी.जी. माळी, राजेश सैनी, हकीम चौधरी, प्रेम परदेशी, विनोद खराटे आदी उपस्थित होते.
या निवडीबद्दल केंद्रीय मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मिलिंद दहिवले व अन्य पदाधिकाऱ्यांनी राजेश पोतदार यांचे अभिनंदन केले आहे.



