तळवेल येथे व्हील क्लब भुसावळ व एकात्मिक बाल विकास योजना यांच्या संयुक्त विद्यमाने पोषण माह अंतर्गत विविध कार्यक्रम संपन्न :

तळवेल -तळवेल येथे पोषण माह अंतर्गत इंनर व्हील क्लब भुसावळ व एकात्मिक बाल विकास योजना यांच्या संयुक्त विद्यमाने विविध भरगच्च कार्यक्रम घेण्यात आले.यामध्ये पाककला स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, धान्य रांगोळी स्पर्धा, मुलांना पौष्टिक आहार वाटप, शेवगा, आंबा, पिंपळ रोपांचे वृक्षारोपण,गरोदर मातांना मार्गदर्शन आदी कार्यक्रम घेण्यात आले.
यावेळी क्लबच्या प्रेसिडेंट वंदिता पारे यांनी पाककला स्पर्धेचे उदघाट्न केले. घोषवाक्य स्पर्धेचे उदघाट्न गायकवाड यांनी केले.
किशोरी मुलींनी पोषणविषयी घोषवाक्य पोस्टर बनवली होती.यामध्ये साक्षी दिपक पाटील, हिला प्रथम व प्रतीक्षा संदीप धरणे, कमल किशोर कोळी, वैष्णवी झोपे, अंकिता पाटील यांना पारितोषिक मिळाले.
गरोदर मातांना सीडीपीओ रेखा गायकवाड यांनी आहारा बाबत मार्गदर्शन केले .


बक्षीस वितरण प्रेसिडेंट वंदिता पारे, सीडीपीओ रेखा गायकवाड,कमल सचदेव प्राची राणे यांच्या हस्ते झाले. स्वाती देव यांनी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमा दिल्या.
क्लब प्रेसिडेंट वंदिता पारे, कमल सचदेव, स्वाती देव, प्राची राणे, जयश्री दवे हजर होत्या.
कार्यक्रम चे सूत्रसंचालन पर्यवेक्षिका जयश्री जोशी यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी
तळवेल येथील सेविका, मदतनीस यांनी परिश्रम घेतले

.