भुसावळ – पँन इंडिया अवरनेस आणि आऊटरिच प्रोग्राम अंतर्गत भुसावळ तालुका विधी सेवा प्राधिकरणामार्फत पंचायत समिती येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाला सहदिवाणी न्यायाधिश आर आर अहिर प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सर्व कर्मचारी खरे क़रोना योध्दा आहेत . व त्यांच्या माध्यमातून जी जनजागृती झाली त्यामुळे एव्हढं लसीकरण शक्य झाले असे म्हटलं अँड.विक्रम शेळके यांनी आणिबाणीच्या परिस्थितीत सर्वांचे कर्तव्य या विषयावर मार्गदर्शन केले .
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उमेश पाटणकर सहाय्यक गटविकास अधिकारी यांनी भुषविले. कार्यक्रमाच सुत्रसंचालन महिला प्रतिनिधी अँड. जास्वंदी भंडारी यांनी केले .

किशोर पिंगाने यांनी उपस्थितांचे आभार मानले. कैलास काळे ,राजेंद्र फेगडे,गिता नागराज ,कल्पना रावल यांचे सहकार्य लाभले.शिबिराला सर्व कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. या समितीतर्फे शहरात पाच ठिकाणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते पंचायत समितीकार्यालय, नगरपालिका कार्यालय, रेल्वे न्यायालय, जिल्हा न्यायालय,सबजेल या ठिकाणी ‘क़ोविड प्रतिबंध लसीकरण जाग्रुती ,उपाययोजना व त्या अनुषंगाने कायदेशिर बाबी याविषयावर प्रबोधन करण्यात आले या शिबीरासाठी पाच पँनल करण्यात आले होते यात जिल्हा न्यायाधीशश्री. एस् पी डोरले, श्री. आर.आर.अहिर सहदिवाणी न्यायाधिश व.स्तर ,श्री.के.एस् खंडारे सहदिवाणी न्यायाधीश क. स्तर,श्री. द.भा.डोमाळे सहदिवाणी न्यायाधीश क. स्तर,श्री.हरिभाऊ डी.देंशिंगे रेल्वे न्यायालय न्यायाधीश , वकिल संघ अध्यक्ष अँड. तुषार पाटील व इतर पदाधिकारी पँनल मध्ये होते.श्री.एस्.आर.पाटील ,जगदीश मानकर , पी.एल्.बेदरकर ,किशोर पिंगाने यांनी यशस्वितेसाठी प्रयत्न केले.


