भुसावळ – येथील युवा संकल्प प्रतिष्ठान गणेश मंडळाचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते निलेश सुरेश चौधरीं यांनी सामाजिक बांधीलकी जोपासली असून येथील प्रभाग 22 मध्ये स्वखर्चाने हाइमास्ट दिवे लावले. या दिव्यांच्या प्रकाशाने परिसरातील नागरिकांसह अबाल वृद्धानी व विशेषता: महिलांसह तरुणीनी धन्यवाद दिले आहे .
प्रभाग 22 मध्ये रिंग रोड वरील परिसरात रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते यामुळे नागरिकांना सतत अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते ही समस्या युवा संकल्प प्रतिष्ठान गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आली व त्यांनी अध्यक्ष निलेश चौधरीं यांचे नेतृत्वात व युवा संकल्प प्रतिष्ठान गणेश मंडळ यांच्या सहकार्याने परिसरातील अनेक ठिकाणी हायमास्ट दिवे लावण्याचां निर्णय घेतला त्यानुसार आज रिंगरोड परिसरात हायमास्ट लावण्यात आले, इतकेच नव्हे तर प्रभागातील सर्व ठिकाणी हायमास्ट लावण्यात येणार असल्याचेही निलेश चौधरीं यांनी यावेळी सांगीतले.

प्रसंगी निखिल कुरकुरे, नितीन कोळी , दिपक चौधरीं , विशाल आत्रे , मिलिंद धांडे, सागर नेहते ,, यशवंत बढे , लतीत झोपे, सागर झांबरे , संदीप जाधव , विक्की चौधरीं ,ईश्वर कोळी , ऋषिकेश रायजादे , अक्षर चतुर , राजू नेहते , भरत रडे , शुभम शाहू , राज गुरु , तेजस अट्रावलकर , लोकेश झोपे , हेमंत बोरसिय , खुशाल जोशी , योगेश पराडे, निखिल चौधरीं , नितिन पॉल, प्रकाश बॉक्सर यांचेसह युवा प्रतिष्ठान मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते अथक परिश्रम घेत आहे .


