भुसावळ –
पंधराव्या वित्त आयोगातून जी कामे होतील त्या व्यतिरिक्त विकास कामांसाठी कटिबद्ध असल्याचे आमदार संजय सावकारे यांनी आश्वासन
शनिवार दिनांक 18 रोजी सकाळी 11 वाजता वार्ड क्रमांक 1 मधील डॉक्टर बाळासाहेब पाटील यांच्या हॉस्पिटल समोरील गल्लीतील रस्ता काँक्रिटीकरनाच्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी दिले आमदार संजय सावकारे यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी सरपंच संजय गोविंदराव पाटील यांच्या हस्ते नारळ वाहून रस्ता कॉंक्रिटीकरण आमचे उद्घाटन करण्यात आले . प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे भुसावळ तालुका विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील ,डॉक्टर बाळासाहेब पाटील , उपसरपंच आनंद ठाकरे ,भारतीय जनता पार्टी तालुका युवा उपाध्यक्ष सचिन सपकाळे , ग्रामपंचायत सरपंच पती विष्णू सोनवणे , माजी सरपंच सुरेश पाटील , अशोक पटेल ,ग्रामपंचायत सदस्य कुंदन कोळी, सागर सोनवाल, गणेश कोळी अशोक सोनवणे गजानन पवार , नारायण तानकु कोळी , प्रकाश कोळी ,राहुल कोळी, हिम्मत सोनवणे सचिन पाटील विनोद कोळी अशोक सपकाळे अनिल सोनवाल ग्राम विकास अधिकारी एस डी पाटील आदींची उपस्थिती होती
प्रसंगी आमदार संजय सावकारे यांचा संजय पाटील व डॉक्टर बाळासाहेब पाटील रवींद्र पाटील (भाऊसाहेब) यांनी स्वागत व सत्कार केला

15 व्या वित्त आयोगातून कॉंक्रिटीकरण, जिजामाता उद्यान सुशोभीकरण, ग्रामपंचायत कार्यालय डिजिटल करणे, मंगल
कार्यालयाजवळ महिला व पुरुष शौचालय बांधकाम, जिल्हा परिषद शाळेत स्वच्छालय बांधकाम वृक्षरोपण ट्री गार्ड, अंगणवाड्यांना संरक्षण जाडी व पेव्हर ब्लॉक, बौद्ध विहार ला संरक्षण जाडीचे कंपाऊंड एलईडी लाइट्स खरेदी करणे, वार्ड, गटार बांधकाम काही ठिकाणी नवीन पाईपलाईन टाकने, आरोग्याच्या संदर्भात उपयुक्त साधनांची खरेदी करणे ग्रामपंचायत स्टेशनरी खरेदी करणे
नोव्हेंबर२०२१ मध्ये सरपंच चषकाचे आयोजन करणे
अशा विविध विकास कामांचा 35 लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध असून संपूर्ण कामांना आजपासून सुरुवात करण्यात आलेली आहे तसेच लवकरच पुढील 35 लक्ष रुपयांचा निधी दुसऱ्या टप्प्यात दिवाळी नंतर प्राप्त होईल व त्यामध्ये प्रलंबित विविध विकास कामे मार्गी लागतील लवकरच स्मार्ट विलेज साकेगाव ग्रामपंचायत राज्यस्तरीय मॉडेल व्हिलेज म्हणून लौकिक मिळवेल असा विश्वास आमदार संजय भाऊ सावकारे यांनी रस्ते उद्घाटन प्रसंगी व्यक्त केला


