भुसावळ – महिला सुरक्षा संघटना व महिला क्रिडा मंडळ भुसावळ यांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून साकी नाका बलात्कार प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी या मागणीकरीता बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक दिलीप भागवत यांना निवेदन देण्यात आले.
या प्रसंगी अध्यक्षा आरती चौधरी, प्रा. माधुरी गुजर, प्रा. माधुरी पाटील व सौ. उज्ज्वला राणे हजर होत्या.
महिलांच्या सुरक्षेसाठी काय करण्यात येईल यासंदर्भात चर्चा करण्यात आली.

महिला क्रिडा मंडळ भुसावळ तर्फे महिलांना, मुलींसाठी स्वसंरक्षणासाठी कार्यक्रम घेणार असल्याचे सांगण्यात आले. यासाठी संपुर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन पोलीस निरीक्षक भागवत यांनी केले. या साठी महाराष्ट्र महिला सुरक्षा संघटनेचे राज्य अध्यक्ष किसनराव पाटील प्रदेश सचिव सिमा पाटील, जिल्हा अध्यक्षा ललिता पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.


