भुसावळ- येथील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्यूनिकेशन शाखेच्या वतीने टेलिकॉम कंपन्यांना रिलिफ पॅकेजची घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर “इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्यूनिकेशन क्षेत्रातिल येऊ घातलेले बदल आणि रोजगाराच्या असणार्या संधि” ह्या विषयी परिसंवाद आयोजित केला होता.

ह्या दरम्यान बोलतांना प्रा.धिरज अग्रवाल यांनी केंद्र सरकारकडून टेलिकॉम कंपन्यांसाठी केली गेलेली रिलिफ पॅकेजची घोषणा म्हणजे टेलीकॉम क्षेत्रासाठीची संजीवनी ठरणार असल्याचे सांगितले . टेलिकॉम कंपन्यांना स्पेक्ट्रम चार्ज आणि समायोजित एकूण महसुल अर्थात एजीआर भरण्यासाठी चार वर्षांचा मोराटोरियम दिला जाणार आहे. एजीआरमध्ये आता नॉन टेलिकॉम रेवेन्यूचा सहभाग नसणार आहे. त्यामुळे टेलिकॉम कंपन्यांना फायदा होईल. मोठ्या प्रमाणावर निधि उपलब्द राहून टेलीकॉम जाळे उभारणे सोपे होईल. टेलीकॉम क्षेत्र हयातून प्रचंड गती पकडणार असून राष्ट्रीयच नाही तर आंतर राष्ट्रीय पातळीवर सुद्धा ह्याचे दूरगामी परिणाम संभवतात कारण टेलिकॉम उद्योगात 100 टक्के एफडीआयला देखील मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे शिक्षण, विपणन, व्यापार, संशोधन आणि रोजगार ह्या प्रत्येक क्षेत्राला ह्याचा फायदा मिळेल. मोठ्या प्रमाणावर नौकरी आणि संशोधनाच्या संधि उपलब्धतेमुळे विद्यार्थी आणि विद्यार्थिंनींनी इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकॉम क्षेत्रातील संधींचा लाभ घेण्यासाठी तयार असावे असे सांगितले.
परिसंवादादरम्यान प्रा.नीता नेमाडे यांनी बोलतांना केंद्राच्या पॅकेजसंबंधित धोरणात्मक निर्णयांविषयी मत मांडले. हे पॅकेज टेलिकॉम सेक्टरसाठी खूप मोठा निर्णय असून ह्यात मंजूरी देण्यात आलेल्या टेलिकॉम क्षेत्रातील संरचनात्मक सुधारणा आणि प्रक्रियाकृत सुधारणांनमुळे टेलिकॉम क्षेत्र परदेशी, देशी तसेच सरकारी गुंतवणूकदारांना विविध संधि उपलब्द करवून देणार आहे. ह्या सुधारणा टेलिकॉम क्षेत्राचा संपूर्ण चेहरामोहरा बदलून टाकत उद्योग, रोजगार आणि संशोधनाच्या संधि उपलब्द करवून देतील असे सांगितले.
टेलिकॉम सेक्टरसाठी मदत पॅकेज, एकूण २६०५८कोटी रुपयांच्या योजना, टेलिकॉम सेक्टरमध्ये 100 टक्के थेट परकीय गुंतवणुक, बॅंक गॅरंटी देखील कमी करणे ह्या सगळ्या निर्णयांमुळे टेलीकॉम कंपन्यांना टॉवर उभारणे, सेवा देणे, पायाभूत टेलीकॉम सुविधा देणे अधिक चांगल्या प्रकारे शक्य होणार असल्याचे प्रा.अनंत भिडे यांनी सांगितले. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्यूनिकेशन ही कोअर ब्रांच असून तंत्रज्ञान किंवा औद्योगिक क्षेत्रात मोठे बदल होत असतांनाही ह्या क्षेत्रातील अभियंत्यांची मागणी स्थिर असते आणि ही मागणी ह्या पॅकेज मुळे आणखीन वाढेल असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. आर.पी.सिंह, अधिष्ठाता डॉ. आर.बी.बारजिभे, विभागप्रमुख डॉ. गिरीश कुलकर्णी, प्रा.गजानन पाटील, प्रा.सुलभा शिंदे यांचेही मार्गदर्शन लाभले.
हिन्दी सेवा मंडळाचे अध्यक्ष जे.टी. अग्रवाल, सचिव एम.डी.शर्मा, कोशाध्यक्ष एम.डी.तिवारी, सत्यनारायण गोडयाले, रमेश नागराणी यांनी ह्या उपक्रमाचे कौतुक केले.


