जळगाव तालुक्यातील भोलाने येथे हातभट्टी अड्डयांवर कारवाई :14 ड्रम कच्चे रसायन,दोन हजार लिटर दारू केली नष्ट : तालुका पोलिसांची कामगीरी ;

जळगाव -तालुक्यातील भोलाने गावी तापी नदीलगत असलेल्या गावठी हातभट्टी अड्डयांवर जळगाव तालुका पोलिसांनी रविवार 5 रोजी चार ठिकाणी छापा टाकून गावठी दारू सह कच्चे रसायन उध्वस्त करून कारवाई केली आहे .
यामध्ये संशयीत आरोपी प्रकाश ढोलू कोळी याच्या ताब्यात 8 ड्रम कच्चे व गरम 1150 लिटर रसायन चालू भट्टी तयार दारू सह 23,000 रु मुद्देमाल मिळून आला .
तर संदीप आधार कोळी याच्या ताब्यात 6 ड्रम कच्चे गरम 850 लिटर रसायन व तयार दारू सह 17,000 रु मुद्देमाल मिळून आला . पळसोद येथील लहू लक्ष्मण वाघ याच्या ताब्यात गावठी हातभट्टीची तयार दारू ,निमखेळी येथील अशोक शहादू अडाळके याच्या ताब्यात गावठी हातभट्टीची तयार दारू मिळून आल्याने प्रोव्ही कायदा अन्वये 04 केसेस दाखल केल्या आहेत .
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी श्री कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार , पोलीस उपनिरीक्षक कल्याण कासार, पोलीस अंमलदार ईश्वर लोखंडे विलास शिंदे ,मिथुन पाटील, ज्ञनेश्वर पाटील ,बापू पाटील, प्रशांत पाटील ,अभिषेक पाटील यांनी केली आहे .