भुसावळ –
कोविड 19 च्या पार्श्वभूमिवर पूर्वानुभव लक्षात घेवून तिसरी लाट आल्यास अत्यंत भयानक वास्तववादी चित्र बघायला मिळेल मात्र हे सर्व टाळण्यासाठी खबरदारी म्हणून शासनाच्या नियामांचे काटेकोरपणे पालन करीत गणेशोत्सव उत्सावात साजरा करा , तसेच एक गाव एक गणपती, एक वार्ड एक गणपती ही संकल्पना राबवून प्रशासनास सहकार्य करा असेही आवाहन नाशिक परिक्षेत्र पोलिस महानिरीक्षक डॉ बी जी शेखर पाटील यांनी केले .
भुसावळ येथील संतोषी माता हॉल येथे दिनांक 5 रोजी दुपारी 3 :30 वाजता गणेश उत्सवा निमित्त सार्वजनिक गणेश मंडळ व डीजे वाद्य चालक मालक यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते
यावेळी व्यासपीठावर पोलिस आयुक्त डॉ बी जी शेखर पाटील , एसपी डॉ प्रविण मुंडे , अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी , उपविभागीय पोलिस अधिक्षक सोमनाथ वाघचौरे , आमदार संजय सावकारे , नगराध्यक्ष रमण भोळे, पोलिस निरीक्षक दिलीप भागवत , इंगळे , विलास शेंडे उपस्थित होते .
गणेशोत्सव सर्वसामान्यांचा उत्सव आहे . आपल्याला उत्सव आनंदाने साजरा करायचा आहे यासाठी कायदा व सुव्यवस्था राखतांना सामाजिक एकता व एकोपा जपला पाहिजे .सण उत्सवाच्या पार्श्वभूमिवर तरुणांनी पोलिस मित्र म्हणून समोर या, पुढाकार घेवून सामाजभिमुख कार्य करा , मात्र कायदा मोडणाऱ्याची गय केली जाणार नाही, गुन्हेगाराला गुन्हेगाराप्रमाणेच वागवू असा इशारा डॉ बीजी शेखर पाटील यांनी मार्गदर्शन करतांना दिला .

पालिका प्रशासनाच्या माध्यमातून मंडळाच्या कार्यकर्त्याना लसीकरण मोहिम राबविन्याचा प्रयत्न करणार असून सार्वजनिक गणेशोसत्व साजरा करतांना पोलिस प्रशसनास सर्वानी सहकार्य करावे असे आवाहन आमदार संजय सावकारे यांनी केले .
कायदयाचे उल्लंघन न करता आनंदात व उत्साहात उत्सव साजरा करा, मात्र दंडात्मक कारवाईची वेळ कोणीही येवू देवू नये अशी अपेक्षा डॉ प्रवीण मुंडे यांनी व्यक्त केली .
कोविड 19 च्या पार्श्वभूमिवर सावधगिरी म्हणून मागील निर्देश व नियमांप्रमानेच अजूनही सर्व सण उत्सव साजरे करायचे आहे, तसेच सामाजिक भान ठेवून कोविड काळात ज्याचे नुकसान झाले त्यांना सहकार्य करून सकारात्मक प्रबोधनपर कार्य करा, ज्यामुळे सुदृढ समाजनिर्मिती होईल असे मत अप्पर पोलिस अधिक्षक गवळी यांनी व्यक्त केले .
यावेळी प्रास्ताविक़ उपविभागीय पोलिस अधिक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी करतांना सांगीतले की, सार्वजनिक गणेशोसत्व साजरा करणाऱ्या मंडळाना परवानगी आवश्यक असून या करीता एक खिड़की योजनेच्या माध्यमातून परवानगी घ्यावी असे आवाहन केले . विना परवानगी कोणत्याही मंडळाची स्थापना होणार नाही, मूर्ती 4 फुटापेक्षा मोठी नसावी , घरगुती 2 फुट , स्टेज मुळे रहदारीस अडथळा निर्माण होणार नाही ,रस्ता मोकळा असावा, विज कनेक्शनास लेखी समंती आवश्यक , तसेच गणेश स्थापना मिरवणूक वा श्री विसर्जन मिरवणूक परवानगी नाही , डी जे , डॉल्बी, आदीं वाद्यास सुद्धा परवानगी नसल्याचे सांगत , गणेशोत्सवात पाळावयाचे काटेकोर नियमांची सविस्तर माहीती दिली.
प्रसंगी मुकेश गुंजाळ , भारत परदेशी , डीजे संघटना अध्यक्ष शेखर पाटिल , यांय्यासह मंडळ पदाधिकारी यांनी मनोगत व्यक्त केले.
सूत्रसंचलन बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांनी केले तर आभार शहरचे पोलिस निरीक्षक इंगळे यांनी मानले .
महसूल अधिकारी व कर्मचारी बीडीओ विलास भाटकर, विज मंडळ अधिकारी यांचेसह शहरातील सर्व गणेश मंडळ पदाधिकारी , डीजे चालक ,तसेच प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते . यावेळी व्यापारी असोसिएशनचे राधेश्याम लाहोटी , अशोक नागराणी , राजेश पारीख , विनोद बियाणी, व पदाधिकारी तसेच ऍड. नंदिनी चौधरीं , एड. कापडे, महिला दक्षता समिती सदस्य यांनी पोलिस महानिरीक्षक डॉ बी जी शेखर पाटील यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले .


