सार्वजनिक गणपती मंडळांच्या परवानगीसाठी एक खिडकी योजना कार्यान्वित – सोमनाथ वाघचौरे :


भुसावळ – शहरातील सर्व सार्वजनिक गणपती मंडळास आवश्यक असणारी कायदेशीर परवानगी घेण्याकरीता पोलिस विभागाने दिलासा दिला असून या करीता एक खिडकी योजना सुरू करण्यात आली असल्याची माहीती भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनीं दिली आहे .

  येत्या गणेश उत्सव 2021 साजरा करण्याकरीता आवश्यक असणारी कायदेशीर परवानगी  घेण्याकरीता त्याअनुषंघाने   संपूर्ण भुसावळ शहरातील ( बाजारपेठ पोलीस स्टेशन व भुसावळ शहर पोलीस स्टेशन हद्दीतील ) गणपती मंडळांना परवानगी देण्यासाठी भुसावळ शहर पोलीस स्टेशन येथे  एक खिडकी योजना सुरू करण्यात आलेली आहे.

याकरीता जे जे सार्वजनिक गणेश मंडळ चालू वर्षाला श्रींची स्थापना करून इच्छितात त्यांनी या ठिकाणी अर्ज करावा. तेथेच सर्व कागदोपत्री बाबींची पूर्तता करावी. मंडळांना येथूनच परवानगी देण्यात येईल जेणेकरून त्यांना वेगवेगळ्या सरकारी कार्यालयांमध्ये जाण्याची आवश्यकता नाही. व परवानगीची प्रक्रिया देखील कमी वेळात व सुलभ होईल. तरी सर्व सार्वजनिक गणपती मंडळांच्या कार्यकर्त्यांनी परवानगीसाठी या एक खीडकी योजनेच्या माध्यमातून परवानगी घ्यावी असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनीं केले आहे .