वरणगाव
सध्या कोरोनाचे सावट असल्याने बहुतांश शाळा बंद असुन घरीच ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू आहे. या अभ्यासक्रमा व्यतीरीक्त विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा यासाठी श्रीकृष्ण जन्मष्ट्मी निमित्त रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्ती व्हॅली व कला कॉस्ट्ुयुम व डिझायनर्स यंांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन राधा कृ,्ण फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
तीन गटात आयोजीत स्पर्धेत पहिला गट वय वर्ष ३ पर्यंत, दुसरा गट ३ ते ५ वर्ष, तीसरा गट ५ ते ९ वर्ष असुन विजेत्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम, स्मृती चिन्ह, प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धकांनी १ मीनीटाचा व्हीडीओ तयार करून व्हॉटसअप गृपवर ५ सप्टेबंर पर्यत पाठवायचा आहे.

अधिक माहितीसाठी कला कॉस्ट्युम व डझाईनर्स चे संचालक गीरीश पांढारकर, शितल पांढारकर, प्रोजेक्ट चेअरमन राजेंद्र परसे प्रोजेक्ट सहसमन्वयक प्रशांत नरवाडे, प्रोजेक्ट सम्नवयक समाधान जाधव, रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्ती व्हॅलीचे प्रेसींडेंट डॉ.संजू भटकर, ट्रेझरर सुनिल वानखेडे, सेक्रेटरी जीवन महाजन यांच्याशी संपर्क साधावा.


