प्रकल्पग्रस्त व प्रकल्पबाधित तरुणांच्या रोजगारासाठी शिवसेनेतर्फे अधिकाऱ्यांना अल्टिमेटम ; अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलनाचा इशारा :


दीपनगर – प्रकल्पग्रस्त व प्रकल्पबाधित तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख व पदाधिकारी बेरोजगारांसह आज 1 सप्टेंबर रोजी पुन्हा दीपनगर येथील 660 मेगावॅट प्रकल्प कार्यालयात शिवसेना पदाधिकारी धडकले.यावेळी जिल्हाप्रमुख व पदाधिकारी यांची अधिकारी यांचेसोबत प्रदीर्घ चर्चा झाली . दरम्यान प्रकल्पग्रस्त व प्रकल्पबाधित गावातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी जोरदार मागणी करण्यात येवून संबंधित अधिकाऱ्यांना आठ दिवसाचा अल्टिमेटम देण्यात आला असून आठ दिवसात संबंधितांनी रोजगार उपलब्ध करून न दिल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलनाचा इशारा व प्रकल्पाच्या कामास कुलूप ठोकण्याचा इशारा देण्यात आला .
याबाबत सविस्तर वृत्त असे की दोन दिवसापूर्वी वेल्हाळेसह परिसरातील प्रकल्पबाधित अनेक बेरोजगार करून शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्या निवासस्थानी येऊन चर्चा करून निवेदन देऊन गेले होते त्यावेळेस त्यांनी प्रकल्पाचे मुख्य अभियंता विवेक रोकडे यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केल्याप्रमाणे बुधवार रोजी सायंकाळी पाच वाजता सर्व बेरोजगार तरुण व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख समाधान महाजन , कार्यालयीन उपजिल्हाप्रमुख प्रा उत्तम सुरवाडे, विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष सोनवणे तालुका संघटक धीरज पाटील ,संतोष माळी , यांचेसह चर्चेसाठी कार्यालयात प्रकल्पबाधित बेरोजगार तरुण व
प्रकल्पाचे मुख्य अभियंता विवेक रोकडे, स्थापत्यचे उपअभियंता श्री तायडे, भेल कंपनीचे व्यवस्थापक एस बी जावळे , वेल्फेअर ऑफिसर एस टी वासुदेव यांचेसह विविध कंपन्यांच्या अधिकारी उपस्थित होते .चर्चे दरम्यान संबंधित प्रकल्पग्रस्त व प्रकल्पबाधित गावातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आठ दिवसाचा अल्टिमेटम दिला व आठ दिवसात संबंधितांनी रोजगार उपलब्ध करून न दिल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा व प्रसंगी प्रकल्पाच्या कामास कुलूप ठोकण्याचा इशारा यावेळी जिल्हाप्रमुख यांसह सर्व पदाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला.


यावेळी श्री रोकडे यांनी येत्या आठ दिवसात रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले तसेच प्रकल्पाचे काम सुरु होत असताना महानिर्मितीचे व्यवस्थापक श्री थंगपंडियन व स्थानिक व्यवस्थापन तसेच शिवसेनेचे पदाधिकारी यांच्या त्या वेळी ठरलेल्या चर्चेची आठवण पदाधिकाऱ्यांनी संबंधित प्रशासनाला करून दिले व येथे लहान मोठी कामे हे प्रकल्पग्रस्त व प्रकल्प बाधित मुलांना देण्यात यावे हे त्यावेळी ठरले होते याची जाणीव करून दिली परंतु आपण आतापर्यंत याबाबतीत कोणतीच कार्यवाही केलेली दिसत नसल्याने यापुढे मात्र ही बाब खपवून घेतली जाणार नाही असा सज्जड दम अधिकाऱ्यांना भरला व यापुढे ठरल्याप्रमाणे कार्यवाही न झाल्यास शिवसेना स्टाईलने वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार मोठे आंदोलन उभे करण्यात येईल असा इशारा दिला प्रकल्पग्रस्त व प्रकल्पबाधितांवर अन्याय करून संबंधित अधिकारी ठराविक ठेकेदारांना हाताशी धरून घाईगडबडीत काम उरकण्याचा गोरखधंदा करीत आहेत तसेच मर्जीतील ठेकेदारांना कामे देऊन मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करीत आहेत हे यापुढे खपवून घेतले जाणार नाही .शासकीय नियम डावलून व प्रकल्पग्रस्त तसेच प्रकल्पबाधित लोकांवर अन्याय करून जर अधिकारी काम असेच चालू ठेवतील तर त्यांना शिवसेना स्टाईलने धडा शिकवला जाईल असेही यावेळी प्रामुख्याने अधिकाऱ्यांना बजावण्यात आले यावेळी पब्लिक वेल्फेअर ऑफिसर यांनी संबंधित सभेचे मिनिट घेऊन सर्वांना अवगत केले. यावेळी पावरमॅक कंपनीचे डी एन सिंग , बी जे सी एल चे प्रमुख अधिकारी यांचेसह वेल्हाळे व वरणगाव तसेच परिसरातील बेरोजगार तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते .