भुसावळ –
भारत पंतप्रधान यांच्या संकल्पनेवर आधारित शासनाच्या विविध विभागातून अभिसरण पद्धतीने 1सप्टेंबर ते 30 सप्टेंबर “पोषण माह” सुपोषित
पोषण अभियान कार्यक्रम देश पातळीवर एकात्मिक बाल विकास योजनेच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे.
पोषण अभियानाच्या अंमलबजावणी करता समाजाचा पोषण अभियान कार्यक्रमामध्ये सक्रिय सहभाग असणे अत्यावश्यक आहे. महिनाभर पोषण संबधित विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहे.आज दर्यापूर येथे अंगणवाडी सरपंच श्रीमती सुशीला राजेश शेटे यांच्या हस्ते पोषण माहचे उदघाट्न झाले. ग्राम पंचायत सदस्य सौं शीतल सुरवाडे, नितीन सोनवणे, गोसावी सर व ग्रामसेवक आर. पी. चौधरी, आकाश भैसे, किशोर इंगळे उपस्थित होते. अंगणवाडी सेविका आशा टोकरे यांनी उपस्थितांना पोषण माह बाबत माहिती दिली. कार्यक्रमास गरोदर माता व किशोरवायीन मुली हजर होत्या.मदतनीस कमल तोरे, किरण कोळी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमास पर्यवेक्षिका जयश्री जोशी यांचे मार्गदर्शन लाभले.



