भुसावळ खून प्रकरण : संशयीत शाहबाज शाहचा जामीन फेटाळला –

भुसावळ : शहरातील हद्दीवाली चाळ येथील प्रतापगड मशिदीसमोर वडाच्या झाडाखाली सुनील इंगळे याचा शाहबाज शहा याने खून केल्याची घटना 7 मे 2021 रोजी घडली होती. संशयीत शाह याने जामिनासाठी अर्ज केला न्या.आर.एम.जाधव यांनी तो फेटाळला. संशयीत शाह याने जामिनासाठी अर्ज केल्यानंतर फिर्यादीचे वकील सत्यनारायण पाल व सरकारी वकील मोहन देशपांडे यांनी हरकत घेतल्याने हा अर्ज फेटाळण्यात आला. दोषारेापपत्र दाखल झाल्यावर शाह याच्यातर्फे वकिलांनी जामिनासाठी अर्ज केला मात्र न्यायाधीश आर.एम.जाधव यांनी फेटाळला. तपास शहरचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संदीप दुणगहू करीत आहेत.