भुसावळ :- टेनिस बॉल क्रिकेट संघटनेची १७ वी १६ वर्षाच्या आतील मुला/मुलांची राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धा नागपूर येथे ४ ते ६ सप्टेंबर २०२१ दरम्यान होणार आहे़, सदर स्पर्धेकरिता जळगाव जिल्ह्यातील खेळाडूंची निवड २८ ऑगस्ट शनिवार रोजी दुपारी २ वाजता नाहाटा कॉलेजच्या मैदानावर भुसावळला होणार आहे,

१ जानेवारी २००५ नंतर जन्मलेल्या खेळाडूंनी क्रिकेटच्या गणवेशात स्वतःची बॅट घेऊन निवड चाचणीस उपस्थित राहावे ,अधिक माहितीसाठी जिल्हा सचिव वासेफ पटेल यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा महासंघटना चे अध्यक्ष प्रा.आ. चंद्रकांत सोनवणे, डॉ. प्रदीप तळवलकर, प्रा. आनंद उपाध्याय ,निना कटलर, गोपाल जोनवाल रमण भोळे, प्रदीप साखरे, बी एन पाटील, राजू कुलकर्णी, मधुकर वाणी, अजय डोळे, खुशाल देशमुख, प्रा आसिफ खान, गोपाल जोनवाल, मेघशाम शिंदे, राहुल कोळी, प्रतिक कुलकर्णी, तारीख अहमद यांनी केले आहे.


